मैत्री , नाती असं नसतंच काही मुळी
असतात ते स्वार्थ अदृष्य , अव्यक्त
या स्वार्थाशी करावी लागते हातमिळवणी
कळत तर कधी नकळत
स्वार्थ बदलत असतात चेहरे
मुखवटे ओळखण्याचं कसब हवं
न जाणले स्वतःस तू पुरते
नको ओरखडे , अव्यक्त असावं
क्षितिजाशी गुज करावं
नभ आणि सागराची रेष व्हावं
निस्वार्थ वैगरे भ्रम आहेत
आपणच जोपासलेले , स्वार्थासाठी
मुक्त झऱ्यासारखं व्हावं
मुक्त आभाळा कवेत घ्यावं
असतात ते स्वार्थ अदृष्य , अव्यक्त
या स्वार्थाशी करावी लागते हातमिळवणी
कळत तर कधी नकळत
स्वार्थ बदलत असतात चेहरे
मुखवटे ओळखण्याचं कसब हवं
न जाणले स्वतःस तू पुरते
नको ओरखडे , अव्यक्त असावं
क्षितिजाशी गुज करावं
नभ आणि सागराची रेष व्हावं
निस्वार्थ वैगरे भ्रम आहेत
आपणच जोपासलेले , स्वार्थासाठी
मुक्त झऱ्यासारखं व्हावं
मुक्त आभाळा कवेत घ्यावं
No comments:
Post a Comment