Thursday, 14 September 2017

खुणा

काही तुकडे आठवणीचे 
अस्वस्थ करतात . ...  
काही तुकडे आठवणीतून
वजा करावेसे वाटतात 

तरीही ते आवश्यक वाटतात 
जगण्याचे भान देण्यासाठी 
ते आवश्यक वाटतात  ... 
माझ्या असण्याच्या जाणिवेसाठी 

वेदना विरतील,  व्रण उरतील 
आता क्लेशही  होणार नाही कारण , 
हे माझ्याच स्वभावाचे बक्षिस आहे 
माझ्याकडूनच मला मिळालेले 


 तेच  उर्मी देतात भविष्याची 
नाहीतर संगती लागणार नाही 
त्यात लपलेल्या अर्थाची ,
धुक्यातून ओझरणाऱ्या प्रकाशाची . 


मनात उमटणाऱ्या तरंगांची 
भविष्यातील  सुप्त आशांची 
गूढ ,अगम्य  संकेतांची 
आडवळणाच्या  पाऊलवाटेवरील खुणांची . 



No comments:

Post a Comment