मला न उमजे , व्यक्त व्हायचे
वादळांच्या दिशांना कसे झेलायचे
मला न उमजे , अव्यक्त शब्द
शब्दांनी शब्दांना , उगा छेडायचे
आज जरी स्तब्ध किनारा हा
आतूनच आता किती सोसायचे
मला न उमजे , तारकांची भाषा
अंधाऱ्या कपारीत , प्रकाशकण वेचायाचे
मनाची मनाला साथ जरी अबोल
मुक्त प्रवाहास किती भेदायचे
जीवन एक अविरत प्रवाह ,
प्रवासात फक्त भिजत जायचे .
वादळांच्या दिशांना कसे झेलायचे
मला न उमजे , अव्यक्त शब्द
शब्दांनी शब्दांना , उगा छेडायचे
आज जरी स्तब्ध किनारा हा
आतूनच आता किती सोसायचे
मला न उमजे , तारकांची भाषा
अंधाऱ्या कपारीत , प्रकाशकण वेचायाचे
मनाची मनाला साथ जरी अबोल
मुक्त प्रवाहास किती भेदायचे
जीवन एक अविरत प्रवाह ,
प्रवासात फक्त भिजत जायचे .
No comments:
Post a Comment