काय मज हवे कळेना
काय तुझं द्यावे उमजेना
स्वरांनी भारले अंगण इवले
सूर का हरवले कळेना
शोधूनही गाभा सापडेना
दूरवर जाई वाट तिथे
दूरवर जाई वाट तिथे
गर्द रानात अबोल पाखरे
गूढ निरव भाव सारे
कळावी माझ्या अंतरीची
गूढ निरव भाव सारे
कळावी माझ्या अंतरीची
मी न सांगता व्यथा
तुज कशी सांगू कळेना
तुज कशी सांगू कळेना
मनाचे मनाशी खेळ सारे
मन मनास सावरेना
तू व्हावे मन माझे
तू व्हावे मन माझे
नाते तरल सोपे उलगडेना
No comments:
Post a Comment