1) तुम्ही म्हणाल तर चुका
मोजदाद का तुम्हाला ?
प्रत्येक क्षणाची काय नशा
काय ठावे तुम्हाला ?
2) कितीही वळणं आली,
तरी वाट तुझ्याकडेच वळणार
मग का हा दुरावा ?
मनावेगळा ,आत जाळणार ?
3) हि अशी येतात स्वप्न
मृगजळाची किनार लेऊन
तो क्षण सरलेला
माझं सर्वस्व विझवून
४) अश्रू नाही मोती हे
असे बिखरू नको
मनाने मनाला
असे उगा दुखवू नको
५) रात्र अंधारून येते
समुद्राच्या गाजात
हलकी स्मित लकेर तुझी
करते अनवधानाने घात
६) नको येऊ म्हणतेस
वाट अश्रूंनी भिजवतेस
मनातले चांदणे
अश्रूंनी विरघळवतेस
७) तू क्वचित येशील म्हणून
तारे तुझ्यासाठी बरसतात
कितीही बरसले अश्रू
तरी वाट तुझी शोधतात
८) तुझ्याशिवाय जगण्याची
कल्पनाच भेसूर होती
जणू राधेविन कान्हाची
बासरी बेसूर होती
९) झाले आता श्वास मोकळे
काहिलीत उन्हाच्या रंग सोहळे
हृदयातील सुप्त सुरांना
गवसले अवचित गीत नवे
१०) कितीही मनाला आवरलं
कितीही त्याला सावरलं
धुंद पावसात तरीही नकळत
अवखळ बालकासारखं ते बावरलं
११) येतो पाऊस सरींसह नकळत
आतून बाहेरून भिजवायला
कितीही आवरलं मनाला तरीही ,
आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलवायला
१२) सांगायचं असलं शब्दांना काही तरीही
ओठाशीचं बिचारे ते थबकणारं
नायनातून उमटतात भाव जरी
पाषाण हृदयास (तुझ्या )कसे ते छेदणारं
१३) नाही कळले , नाही उमगले
अंतरीचे भाव अंतरी उरले
सांगायचे कित्येक क्षण जपले
मनात उमटले , मनात विरले
१४) मनाच्या मीलनाला तारका कशाला
वॅलेंटाईन फक्त निमित्तमात्र आहे.
न बोलता कळते सर्व भाव तर
शब्दांची अविरत कसरत कशाला
No comments:
Post a Comment