नको येऊस भिजलेल्या अश्रूत वाहून जाशील
नको येऊस जीवघेण्या शांततेत गळून जाशील
नको येऊस सर्वस्व दिले तुला , रिकामी जाशील
नको येऊस पूर्वीसारखा मी वेडा राहिलो नाही
मलाही थोडेफार व्यवहार कळायला लागलेत
नको येऊस मी पूर्वीसारखा हळवा राहिलो नाही
अव्यक्त शब्दांचे अर्थ तुला कळले नाहीत
ते अदृश्य धागे तुला कधी दिसणार नाहीत
नको येऊस शब्दचांदणं मला झेपणार नाही
अश्रूच कोरडे झालेत अन आतल्या संवेदनाही
आकाशाचे रंग असे दिसणार नाहीत
नको येऊस अव्यक्त संवेदना जाणवणार नाहीत
तरीसुद्धा आलीस तर .....
नेहमीसारखाच कदाचित मी विरघळून जाइन
म्हणून नको येऊस पुन्हा जाण्यासाठी ...
नको येऊस जीवघेण्या शांततेत गळून जाशील
नको येऊस सर्वस्व दिले तुला , रिकामी जाशील
नको येऊस पूर्वीसारखा मी वेडा राहिलो नाही
मलाही थोडेफार व्यवहार कळायला लागलेत
नको येऊस मी पूर्वीसारखा हळवा राहिलो नाही
अव्यक्त शब्दांचे अर्थ तुला कळले नाहीत
ते अदृश्य धागे तुला कधी दिसणार नाहीत
नको येऊस शब्दचांदणं मला झेपणार नाही
अश्रूच कोरडे झालेत अन आतल्या संवेदनाही
आकाशाचे रंग असे दिसणार नाहीत
नको येऊस अव्यक्त संवेदना जाणवणार नाहीत
तरीसुद्धा आलीस तर .....
नेहमीसारखाच कदाचित मी विरघळून जाइन
म्हणून नको येऊस पुन्हा जाण्यासाठी ...
No comments:
Post a Comment