( रंगमंचावर मध्यभागी एक खुर्ची आहे. पती खुर्चीवर बसले आहेत
. पत्नीला चिडवण्यासाठी ते खालील गाणं गात आहेत . )
पती - तोच चंद्रमा नभात ....तिच चैत्र यामीनी
.........
पत्नी -अहो ! तुमचा तो चंद्रमा राहू द्या नभात. आपल्या
चंदूच बघा आधी . नापास झालाय तो ! तुम्हाला काही काळजी आहे की नाही ? किती कठोर आहात तुम्ही ? आम्ही आपलं मरमर मरावं आणि तुम्हाला काही
घेणदेणंच नाही . आम्ही सांगावं तर आमचं ऐकतो कोण ? तुमच्या
लाडामुळे बिघडलंय कारट !
पती -(pause घेऊन ) झालं तुझं
सुमे ! तुझी सरबत्ती सुरु झाली की महाराजांच्या तोफा सुरु झाल्यासारख्या वाटतात .
अग मलाही काळजी आहे त्याची. आता हे बघ हे अंबानी , एडिसन
कुठे जास्त शिकले! फक्त व्यासंगाने ते यशस्वी झाले!
पत्नी - तुमचे ते एडिसन ... फेडीसन मला नका सांगू !
तुम्ही काही बघणार नाही ! मीच दादाला सांगून कुठेतरी चिटकवते त्याला !
पती - अग चिटकवायला तो काय पोस्टाचं तिकीट आहे का ? त्याला नाट्यक्षेत्राची आवड आहे , करू देत त्याला काय करायचं ते !
तो नापास झाला कारण त्याची आवड नसताना त्याला
वेगळ्याच विषयात पदवी करायला लागली.
केवळ पदवीच करायची तर ती नाट्य क्षेत्रातही करता येते. तुझा हट्ट म्हणून वेगळ्या विषयाकडे पाठविलं. तरी बर झाल पदवी बरोबरच त्याचा खाजगी नाट्य क्षेत्राचा अभ्यासक्रम सुरु ठेवला. शिक्षण देण्याची आपली जबाबदारी आपण पार पाडली आहे ! त्याला कळत काय करायचं ते !

पत्नी - त्याला काय कळतंय ? अजून
लहान आहे तो !
पती -लहान ? आता तो पंधरावीला आहे !
म्हणजे वय वर्षे २० ! अजून वय लहानच !
पत्नी - आईसाठी मुलं लहानच असतात कायम ! त्याला नोकरी लागली, लग्न झालं की संपली आपली
जबाबदारी !
पती - नाही सुमे! नाही संपत ! हे सर्व कराचं! परत त्यांची पोर-बाळ सांभाळा ! आपल्या समाजात हे चक्र कायम सुरु
असतं . पाखरांकडे बघ ! मुलांच्या पंखात बळ आलं की , ती
आपल्या बाळांना मुक्त करतात !
पत्नी - ती पाखरे आहेत !आपण माणसं आहोंत ! आपली रीत
वेगळी !
पती - नाही सुमे निसर्गाचा नियम सर्वांना सारखाच असतो
. तुझ्या नाही लक्षात येणार ! तू ये इथं ! मी काय सांगतो ते ऐक ! तू सुशिक्षित आहेस त्यामुळे मी तुला जे काय सांगतो आहे ते कळेल.
आपल्याकडे बघ
! पालक मुलाला जन्म देण्यापासून त्यांना मुलं होईपर्यंत कायम जुंपलेली
असतात .आपण आपलं आयुष्य कधी जगणार ?प्रत्येकाचा जगण्याचा एक स्वतंत्र परीघ असतो हे मान्यच नसतं आपल्याला .
मुलं स्वतःहून पंख उघडायला कधी शिकणार ? त्यांनी स्वतःहून जगाचा अनुभव घेतल्याशिवाय ती परिपक्व कशी होणार ? आपण गृहीतच धरतो मुलांना काही कळणार नाही . ती आजच्या युगातील मुले आहेत संगणक युगातील ! माहितीचा सर्व पसारा एका क्लीकवर त्यांच्यासमोर हजर असतो . त्यामुळे जगात नेमकं काय चाललंय याची जाणीव त्यांना असते . नाट्यक्षेत्र पूर्वी सामान्य कुटुंबात निषिद्ध मानलं जायचं . आता संकल्पना बदलल्या आहेत . अनेक तरुण -तरुणी या क्षेत्राकडे व्यवसाय म्हणून पाहत आहे .
नवीन बदलला पटकन सामोरे जाताना अडचण होते, हे मान्य आहे मला . पूर्वांपार जे मनावर बिंबवल गेलंय त्यानुसार अभ्यास करण्याची एक समान कार्यपद्धती आपल्याकडे अनुसरण्यात येत असल्यामुळे असे बदल पटकन पचनी पडत नाहीत . तुला एका महान व्यक्तीचा घडलेला एक किस्सा सांगतो. त्यांचं नाव अल्बर्ट आईनस्टाईन!मग तुला कळेल मला नेमकं काय सांगायचं आहे ते ?

अल्बर्ट आईनस्टाईन या थोर शास्त्रज्ञाला एका गृहस्थाने एकदा एका बैठकीत विचारले? अमुक-अमुक याचा फॉर्म्युला काय आहे ? त्यांनी सांगीतले, "मला
नाही माहित. त्यावर तो गृहस्थ म्हणाला," तुम्ही एवढे मोठे शास्त्रज्ञ असून तुम्हाला कसे नाही माहित?" त्यावर त्यांनी उत्तर दिले ,"फॉर्म्युला लक्षात ठेवण्याची काय गरज
आहे? मी उगाच डोक्यात कचरा कशाला भरुन ठेऊ. त्यासाठी संदर्भ ग्रंथ आहेत .
माझ्या बुध्दीचा उपयोग अधिक तार्कीक पध्दतीने विचार करण्यासाठी करेन" सांगण्याचा हेतू हा की , आपली शिक्षण पध्दती पाठांतरावर आधारीत. त्यामुळे मुलांनाही आज स्वत:हून विचार करण्याची, निर्णय घेण्याची सवय लागत नाही. यात मुलांना दोष देण्यात अर्थ नाही. अशा प्रकारे अभ्यास त्यांनी केलेला नसल्यामुळे नवीन बदलाला सामोरे जाताना ते भांबावतात.
विदेशात
तुम्ही कितीही मोठे तज्ञ असलात तरी ठराविक कालावधी नंतर उजळणी वर्गाला सामोरे जावे
लागते. कारण असे की, शिक्षणाचे संदर्भ, व्याख्या
काळानुरुप बदलत असतात. तिथे शिक्षण ही निरंतर प्रक्रिया मानली जाते. आपल्याकडे असे होताना दिसत नाही. थोडे शिकले की , सर्वच स्वतःला तज्ञ मानायला लागतात . कितीही आलं तरी आपली पाटी कोरी ठेवावी नवीन शिकण्यासाठी! हे सर्व संस्कार आपण आपल्या मुलावर केले
आहेत. त्याला वाचनाची गोडी लावली आहे. तोही सर्व जबाबदारीने करतो. त्याला अभिनय
क्षेत्रात जावयाचे आहे.
अगदी सोपं करून सांगतो! एखाद्या विशिष्ट आवडीशिवाय , तुम्ही इतर काही करू शकत नसाल , इतर काही भावतचं नसेल, इतका जर कशाचा व्यासंग असेल तर तेच करावं ! अभिनय हा त्याचा व्यासंग आहे! तुमचा व्यासंगच तुमचा व्यवसाय झाला की, यश आपोआपच आपल्या मागे येते. अगदी सोपं करून सांगतो त्याला करु दे काय करतोय ते!

पत्नी :- तुमच पटतय पण लोक काय म्हणतील?
पती:- तो काही वावग
काम तर करत नाही ना आणि ते त्याचं आयुष्य आहे त्याला ठरवू दे. आता निर्णय पक्का!
पत्नी:- येस बॉस!
मुलगा:- पप्पा मम्मी मी इथेच आहे. मी ऐकतोय सारं . मला नाही विचारणार काय करायच ते? हो! हो! मला अभिनय क्षेत्रातच जायचं आहे! ते तर मी करणारच आहे. परंतु त्या बरोबरच
समाजसेवा करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे. परवा सिंधुताई सपकाळ यांची मुलाखत
बघितली. या माऊलीने स्वत:कडे काही नसताना अनाथ मुलांसाठी खुप काही केलं ! आपल्याकडे
तर सर्व आहे! मी अशी अनेक मुले बघितली आहेत जी, परिस्थिती नसल्यामुळे आपली आवड जोपासू शकत नाहीत . मी अशा मुलांना मदत करायच ठरवलं आहे. अर्थात मी कमवायला लागल्यावर! तुमची कोणतीही मदत न घेता.
पती:- सुमे मुलगा मोठा झाला गं !
पत्नी:- हो, खरच कळलच नाही! (दृष्ट काढते)
(वरील प्रसंग एकपात्री प्रयोगार्थ लिहिला आहे. सदर प्रसंगातील वडील हे
आजच्या काळातील परीपक्व, संयमित पिता आहेत. त्यामुळे त्यांना
चिडखोर दर्शिविण्यात आलेलं नाही. दिग्दर्शकांनी प्रसंग चित्रित करताना ही गोष्ट
कृपया विचारात घ्यावी. तसेच वरील प्रसंगाचा वापर प्रयोगात केल्यास कृपया कॉमेंट
बॉक्स मध्ये त्याचा निर्देश केल्यास आनंद होईल. सदर प्रसंगातून आजच्या मुलांनी, पालकांनी बोध घ्यावा एवढाच हेतू आहे.)
No comments:
Post a Comment