हा बापूंचा देश माझा ...
अहिंसेचा जुनाच वसा ..
मेघ बरसती प्रेम इथे .
नद्या गाती मंजुळ गाणे .....
दर्या जिचा सखा सोबती ...
त्या दर्यावर गाव माझे ...
प्रेमळ छाया मुंबाईची माया
व्यस्त माणसे , गजबजाट असे ...
कर्मण्येवाधिकारस्ते ... कर्म हाच धर्म
त्यास मर्म अघोरी कसे ठावे,
अवकाशी उमटेल काळी माळ
त्यातून उतरतील लांडग्यांचे थवे
पाषाणी चेहरे , भयाण डोळे
रक्तपात नित्य सोहळे
रक्त जयांचे सगे -सोयरे
मनी हीन भावना वसे
रडली माय मुंबादेवी
थिजली जमीन रक्ताने ...
विदीर्ण मने , तुटली स्वप्ने ...
विकट कसाबी हास्याने
त्या हास्यात , रक्त सड्यात
भीषणतेच्या तांडव नृत्यात
सुन्न काळवंडलेल्या नभात
बापूही हरले , बापूही रडले
मनी हीन भावना वसे
रडली माय मुंबादेवी
थिजली जमीन रक्ताने ...
विदीर्ण मने , तुटली स्वप्ने ...
विकट कसाबी हास्याने
त्या हास्यात , रक्त सड्यात
भीषणतेच्या तांडव नृत्यात
सुन्न काळवंडलेल्या नभात
बापूही हरले , बापूही रडले
No comments:
Post a Comment