Thursday, 27 December 2018

राधा -कृष्ण

राधा 

तुज कधी  कळेल प्रीत
विरहाचे माझे गीत ....
झाली  राधा वेडी  वेडी
तुज प्रिय तुझी बासुरी

आळवशी नयन मिटूनी
राधेला या सदा छेडसी
मी भोळी राधा बावरी
एका नजरेची तुझ्या भुकेली

कृष्ण 

सूर जगीचे छेडताना राधे
घालमेल कशी न कळली
प्रीत तुझी अनवट गाणे
विरहाचे ते आगळे तराणे

भेट आपुली भौतिक सागर
प्रीत तुझी आत्मानुभूती
जरी नयन माझे  मिटलेले
अंतरी चित्र तुझेच वसलेले


1 comment: