क्षितिजावरून उडणारे पक्षांचे थवे
मी नेहमी पहायचे ,
अन मी ठरवले ....
त्यातले एक न व्हायचे .
मला तर क्षितिजापल्याडचं
खुणावत होतं आकाश....
स्वप्नांनी भारले होते...
माझे छोटेसे अवकाश .
बाबानेच हे स्वप्न दाखवले
मी तर फक्त गुंफले धागे
त्यांनी उठ म्हणता उठले
त्या स्वप्नातच मी रमले ....
ते माझंही स्वप्न होतं ...
अगदी आतलं , आतूनच आलेलं
तसं तुम्हाला कधी कधी
कौतुक असायचं ...
तोंडी लावण्यापुरतं ....
माझं टॉपर असण्याचं ....
आणि मग सुरु व्हायची तुमची ....
मला कोशात अडकविण्याची पेरणी
तूम्ही हळूच समाज , संस्कार ,रीत,
अशी गोंडस आयुधं,
माझ्या उडणाऱ्या पंखावर लादलीत
जी फक्त माझ्यासाठीच होती.
मी बळच हरवून बसले पंखातले
मग सुरु झाली नव्याची नवलाई ....
ओसरत नाही ती ....
तर नऊ महिन्याची घाई
मग मीही संस्काराचा पदर खोचला
अन बाळाच्या डोळ्यात उभा केला
माझ्या स्वप्नांचा डोलारा ....
विसरुनच गेले मी ....
की मी कधी टॉपर होते .....
आता तुम्ही म्हणाल ....
ही जरा जास्तच बोलते
नाही ... मला हेही हवं होत
पण माझंही काही स्वत्व होत
माझं स्वतःच एक विश्व होतं
सोयीस्करपणे दुर्लक्ष केलेत तुम्ही
की मी कधी टॉपर होते ..
त्यातले एक न व्हायचे .
मला तर क्षितिजापल्याडचं
खुणावत होतं आकाश....
स्वप्नांनी भारले होते...
माझे छोटेसे अवकाश .
बाबानेच हे स्वप्न दाखवले
मी तर फक्त गुंफले धागे
त्यांनी उठ म्हणता उठले
त्या स्वप्नातच मी रमले ....
ते माझंही स्वप्न होतं ...
अगदी आतलं , आतूनच आलेलं
तसं तुम्हाला कधी कधी
कौतुक असायचं ...
तोंडी लावण्यापुरतं ....
माझं टॉपर असण्याचं ....
आणि मग सुरु व्हायची तुमची ....
मला कोशात अडकविण्याची पेरणी
तूम्ही हळूच समाज , संस्कार ,रीत,
अशी गोंडस आयुधं,
माझ्या उडणाऱ्या पंखावर लादलीत
जी फक्त माझ्यासाठीच होती.
मी बळच हरवून बसले पंखातले
मग सुरु झाली नव्याची नवलाई ....
ओसरत नाही ती ....
तर नऊ महिन्याची घाई
मग मीही संस्काराचा पदर खोचला
अन बाळाच्या डोळ्यात उभा केला
माझ्या स्वप्नांचा डोलारा ....
विसरुनच गेले मी ....
की मी कधी टॉपर होते .....
आता तुम्ही म्हणाल ....
ही जरा जास्तच बोलते
नाही ... मला हेही हवं होत
पण माझंही काही स्वत्व होत
माझं स्वतःच एक विश्व होतं
सोयीस्करपणे दुर्लक्ष केलेत तुम्ही
की मी कधी टॉपर होते ..
छान आहे कविता
ReplyDelete