खूप आत बरंच काही साचलंय
अनंत अवकाशासारखं
पार क्षितिजापर्यंत ...
त्या क्षितिज रेषेवरच माझी
स्वप्न विरघळून जातात
अवचित ....
सूर्य उगवताना
पल्लवित आशा ,
बुडताना मावळतात ...
आणि व्हाऊन जातात .... स्वप्न माझी
ओघळणाऱ्या आसवांसावे ...
हळुवार लाटांसवे ..
धूसर झालेली स्वप्न ....
ओघळणाऱ्या अश्रूत
मग दृष्य होऊ लागतात ...
मनावर आलेले मळभ
हळूहळू विरु लागते ...
दिशा काहीशा दिसू लागतात ...
आणि स्वत्वाची जाणिव
नव्याने होऊ लागते ..
तेव्हा मी ठरवते ....
त्या क्षितिजापार पहायचे आहे
तिथला गंध....
अंतरंगात साठवायचा आहे ....
हे होत हल्ली कधी कधी
मुक्त व्हायचं .....
पाखरांसारखं उडायचं ....
आणि होते जाणिव जेव्हा
पाखराचे पंख आता त्याचे
उरले नाहीत ....
तेव्हा एक खंत
मनात सलते ...
आणि
एक कविता ...
अश्रू होऊन ओघळते ....
No comments:
Post a Comment