हृदयातील बेचैन पाखरे
तुझेच गीत गातात ...
येशील अवचित कधी
नयन वाट पाहतात ...
येशील कधी न ठावे
अंतरी गीत तुझेच का यावे
न कळले माझे मला ते
कधी मन ते हरवून गेले
हरवून गेले ते स्वप्न होते
किती नको म्हणावे का
परतून यावे ....
येशील स्वप्नात का ?
खोटे तरी हो म्हणावे ......
या स्वप्नांचा सुंदर साज आहे
त्याचाच अनवट आधार आहे
स्वप्न जरी ते माझे आहे ...
माझ्याच भावनांचा तो आकार आहे ..
माझ्याच भावनांचा तो आकार आहे ..
तुझेच गीत गातात ...
येशील अवचित कधी
नयन वाट पाहतात ...
येशील कधी न ठावे
अंतरी गीत तुझेच का यावे
न कळले माझे मला ते
कधी मन ते हरवून गेले
हरवून गेले ते स्वप्न होते
किती नको म्हणावे का
परतून यावे ....
येशील स्वप्नात का ?
खोटे तरी हो म्हणावे ......
या स्वप्नांचा सुंदर साज आहे
त्याचाच अनवट आधार आहे
स्वप्न जरी ते माझे आहे ...
माझ्याच भावनांचा तो आकार आहे ..
माझ्याच भावनांचा तो आकार आहे ..
No comments:
Post a Comment