पावसाच्या जेव्हा सरी कोसळतात
मनकप्पे तेव्हा का ओलावतात ....
येतं भिजलेलं पाखरू हळूच
तुझंच गीत गायाला .....
वेलींना कसे गमे गुज ते,
हिरव्या माना डोलाया
मनकप्पे तेव्हा का ओलावतात ....
येतं भिजलेलं पाखरू हळूच
तुझंच गीत गायाला .....
वेलींना कसे गमे गुज ते,
हिरव्या माना डोलाया
डोंगर दऱ्यातून येई वारा ..
सरितेचा तर हर्ष केवढा ..
चिमणी पाखरे कितीक आतूर
आणि दंवबिदुंची माळ स्वागता
तुला न आवडे पाऊसगाणे
सरीत त्या व्हाऊन जाणे ...
त्या सरीत खोल खोल दरीत
कधी कळत .. कधी नकळत ..
आठवणी डोळ्यातून ओघळतात
का आठवणी डोळ्यातून ओघळतात...
No comments:
Post a Comment