माय ज्ञानेशाची , माय तुकयाची
झुंज फिजूल , ऱ्हस्व दीर्घांची ...
हा शाप जुनाच मराठी मातीचा......
स्वर स्वरादीतून मार्ग शोधते ती
राजा माझा जाणता ,त्याने जाणियलें
मोल मराठी बोलीचे , मातीत रुजविले
तुम्हास का ओझे , अमुचीच माय गे
ज्ञानगंगेच्या प्रवाहात का हरते ती
राज्य मराठीचे हे , रक्त-औक्षणे झाले
ललाटी भाग्य दीप ,जिने रेखियले
तुम्हांस का हो, न्यूनगंडे पछाडले ...
आपुल्याच मातीत का दुभंगते ती
वचन माझेच मला , माझ्या मायबोलीचे
स्वप्न माझ्या राजाचे ,माझ्या शिवबाचे
दरवळ माय बोलीचा, रुजावा रानोमाळ
स्वप्नातून उभारी, घेईल भरारी ती
ज्ञानदिंडी मराठीची सर्वदूर वावरू दे
एक मात्रा माझीही, या प्रवासात लागू दे ...
तिच एक आशा , तिचं जाणे गुंफणे...
मराठी मनाला मनाने जोडील ती ..
No comments:
Post a Comment