हे आता नेहमीचंच ... न बोलता मूकपणे बघणं ..
अन हळूच डोळ्यांच्या बाहुल्यात साठवून घेणं ...
आठवणी विरघळतात याच तुझ्या पाणेरी डोळ्यात ...
शब्द तुला काही सांगू पाहतात .. पण तू असतेस आत्ममग्न
गालावरच्या खळीत तर.... कधी पाखरांच्या बोलीत...
ती पाखरही वेडी .... घुटमळतात माझ्यासारखीच....
आसपास ... स्वप्नात ...क्षणाक्षणात .. फक्त तुझ्यासाठी
कधी सांगू पाहतात ... नजरेने .... तर कधी शब्दांनी
नजरेचे इशारे कळूनही .. अलिप्त राहणं... नजरेआड करणं
छान जमत तुला ..कळुनही सर्व ... न कळल्यासारखं करणं
आणि माझं मलाच कळत नाही तरीही तुझ्यात गुंतत जाणं ...
मग शब्दांचा आसरा घेत मी काही सांगू पाहतो ... तर ...
शब्दांनी शब्दांना समजून घेण्याआधीच धुडकावून लावतेस
तर शब्दांनी व्यक्त व्हायचं कसं ... न बोलताही... मूकपणे
व्यक्त ही व्हायचं नाही आणि नुसतंच अस्वस्थ रहायचं..
मनचं सर्व बोलते तर ...तर शब्दांचं काही कामचं नव्हतं
नुसताच शब्दांचा खेळ .... खरं सांगायचं तर
कधी काही नात्यांचा लागतंच नाही मेळ
सर्व नाती सहजतः उलगडली असती तर ...
घेता आला असता का उलगडणाऱ्या पाकळ्यांचा गंध...
हळुवार कुरवाळत ...निशःब्द होऊन कणाकणाने
घेता आला असता का मनात भरून अगदी आतपर्यंत ...
मनकोन्यात .. तळकप्प्यात .. आसूसून ..तृप्त होईपर्यंत
कसं सांगावं तुला ... हे मोहरून जाण .. फक्त मलाच होत का .....
आत जळणं खोलपर्यंत ... तरीही अतृप्त राहणं ....
जसं दवबिंदू हातातून निसटून जाणं ..काय बोलू
मला नाही सांगता येणार नेमकं .... थोडे शब्द गडबडतात
थोडे अडखळतात .... काहीवेळा चक्क निसटतात ...
माझे शब्द अपुरे पडतात ..पण तो तुझा कटाक्ष जीवघेणा ....
सर्व काही सांगतोय असं वाटताना .... रुक्ष होतो .. .
मीच समजावतो मग मनाला .... असेल तिची काही व्यथा
जे वाट्याला आलं त्यातच तृप्त हो ...उजळणी कर त्या क्षणांची
मग वाटत सर्व काही असच राहू द्यावं .... आकाशासारखं निरभ्र
नको उगाच काळ्या मेघांची किनार ....
एका स्वच्छ नात्याला .... एका गोंधळलेल्या मनाला ....
कशाला उचकटयाचे अर्थ ... होऊ दे गुंतागुंत माझी
निदान आठवण तुझी ... असण्याचं भान देते जगण्याला ...
हे सर्व बोलायला ठीक आहे ... तरीही वाटत ग ...
तुझ्या असण्याने जगण्याचे संदर्भ बदलले असते ...
मिठीत तुझ्या अवघे विश्व मला कस्पटासमान भासले असते
तुझं असणं ... रुसणं ... हसणं सर्वच वेड्यासारखे अनुभवले असते ...
तु जवळ असलीस की कसं राजासारखं वाटायचं
चंद्र , सूर्यालाही थोडं न्यूनगंडाने पछाडायचं....
सुख मुठीत नाही मावायचं ...
इतकं की मग नंतरच रितेपण .... डोळ्यातून वाहायचं
वाहणाऱ्या त्या पाण्यात .... व्हायचं मन सैरभैर तरीही
मग तुझ्या आठवणी अंतरंगात रुजवून रमायचं
ते तुझं कधी संथ तर कधी द्रुतलयीत दर्यासारखं उधळून येणं
आणि अवचित शुष्क करून लुप्त होणं ...
मला अजूनही आठवतं तुझं लाटांशी खेळणं
आणि लाटा अंगावर आल्या की हळूच मिठीत शिरणं
तर कधी क्षितिजापार एकटक पहात रहाणं ...
आणि पाण्याने भरलेल्या अश्रूंनी मला भिजवणं ....
मग सांग मला , तुजविन आता काय करू ओठावरील दवबिंदूचं ......
आणि अवचित येणाऱ्या थंडगार झुळुकेचं ....
कशा करू तुजसाठी चांदण्यातील कविता
आणि माळू ऐन वसंतात गजरा .....
आणि काय करू भिजवणाऱ्या पावसाचं ...
आणि किलबिलणाऱ्या खोडकर पाखरांच ...
डोंगराआडून पाहणाऱ्या त्या सूर्याचं ...
आणि केवळ आपल्यासाठीच डोलणाऱ्या वेलींचं
तू गेलीस आणि मी कवी झालो ... थोडा कलावंत झालो
तुला वाटलं असेल झगमगत्या प्रकाशात मी सर्व विसरून गेलो
मोहाचे अनेक क्षण आले .... पण चित्र तुझेचं होते हृदयात
खरंच सांगतो कधीच केली नाही मी प्रतारणा तुझी अन प्रेमाची
तुला वाटतंय मी आनंदोत्सव साजरा करतोय
हे आभास आहेत मीच माझ्यासाठी निर्माण केलेले
खरतर पोरखेळ तुझं लक्ष वेधण्यासाठी .....
तू फक्त निर्विकारपणे बघशील हे माहित असूनही
नको झालंय आता सर्व ..अपेक्षा ... सहानुभूती ...
वरवरचा जिव्हाळा .. आणि सर्वच अंगचटीस येणार
शून्य वाटतं ... एक खोल कृष्णविवरी शून्य ...
या शून्यातून तुझं असणं हाच एक मंदसा प्रकाश
खरं सांगतो तुझ्याइतकं कशातच रमत नाही मन
फक्त सरतायेत अविरतपणे क्षणांमागून क्षण ...
आणि ओढतायेत मला फक्त तुझ्याकडेच
हे सर्व मागे सोडून निशःब्दपणे येईन .... तू फक्त हो म्हण ..
साठवून ठेवलाय आठवणींचा एक एक बिंदू मनकोन्यात ...
अमुल्य मोत्यासारखा ..... अगदी जपून हळुवार ...
कधी मनात चित्र आकारतो .... कधी शब्दात
पण जागवतो तुझ्या आठवणींचा जागर न चुकता अंतरंगात
अन आज प्रेमाच्या दिवसाला तू गुप्त असशील अवचित
कदाचित मी पुन्हा प्रपोज करेन म्हणून .... हसत असशील मनात
आणि वाटही पहात असशील ... तशीच मान तिरकी करून
सगळंच अगम्य तरीही हवंहवंसं वाटणारं... सगळंच ...
मला आवडलं असत ग ... तुझं मूकपणे असणंही ...
मी गुंतून राहिलो असतो तरीही .... सूर्यास्तापर्यंत ...
चंद्राला साथीला घेईपर्यंत .... आणि चांदण्यात चिंब होईपर्यंत
अगदी उगवत्या सूर्याची किरणे तुझ्या केसात उगवेपर्यंत
कारण नसता देऊ शकला तुला कुणीही ..
माझ्याइतका फुलाच्या गंधाचा आनंद.. अगदी ओथंबून
शेवटच्या क्षणापर्यंत .... शेवटच्या श्वासापर्यंत ....
अन मनाने मनात विरघळून जाईपर्यंत ...

No comments:
Post a Comment