आपल्या सुरक्षित डबक्यात संकुचित आत्ममग्न किडे
असे अनेक आहेत आपलीच पाठ थोपटणारे बडवे ...
आणि याच किड्यांसाठी सरहद्दीवर रक्त शिंपण करणारे वेडे
काय हा विरोधाभास आणि जवानांच्या विचाराची उंची
जे नाही चिवडत जात , पंथ , धर्म ....
मातृभूमीसाठी लढायचे आणि मरायचेही फक्त त्यांचे कर्म ..
डोक्यात राख , डोळ्यावर पट्टी अशी तरुण माथी ...
तरीही सहिष्णतेच्या अतिरेकाने जवानांच्या जीवाशी खेळायचे
आणि याच बेदरकार तरुणांचे दगड त्यांनी फुलासारखे झेलायचे ...
तेव्हा त्यांच्या अर्धांगिनीचे आक्रोश डोळ्यातून ओघळतात
आणि कमकुवत मनाचे स्पंद आतल्या आत आक्रंदतात
जाणीव होते आपल्या उणेपणाची आणि फक्त मुठी आवळतात ...
कारण ....
पक्की खात्री होते ते आभाळापेक्षा उंच आहेत ...
नाही लायक त्या जवानांसारखे आपण , जे खरेखुरे नायक आहेत
म्हणून मला वाटत ...
मातृभूमीसाठी रक्त नको ..निदान शब्दांनी देश जोडूया ....

No comments:
Post a Comment