माझा विश्वास आहे, ही देवभूमी आहे
पान, फुलं,वेली ,पक्षी ,प्राणी आणि माणसांचाही
जरी रंग वेगळा आहे , ढंग वेगळा आहे .
फक्त मानवालाच होत नाही याच आकलन ....
देवाच्या निर्मितीचे , विविधतेतील एकरूपतेचं ....
माझा रंग तुझा रंग .... पडलाय कधी रंगहीन प्रश्न
गगनी विहरणाऱ्या मुक्त विरक्त पाखरांना ...
करतात का कधी प्रश्न, प्राणी आणि वेलीही ....
विश्वाच्या निर्मात्याला आणि त्याच्या उद्दात्त हेतूला ...
ते निभावतात कर्म ... निरपेक्षपणे देवाच्या सृष्टीचे ...
देवाने दिलंय प्रत्येकाच्या जगण्याला एक उद्दिष्ट
जे तुम्हालाच शोधायचं आहे आत्मचिंतनातून ...
नाही भरकटयच्या दिशा कणाहीन द्वेषातून ....
विश्वास ठेवा तुमच्यासाठी त्याची नक्कीच आहे एक योजना
तोपर्यंत आहे फुरसत .... आणि बाळगायचा आहे संयम
विश्वास ठेवा... ... तोपर्यंत ... बाळगायचा आहे संयम ....
No comments:
Post a Comment