Saturday, 17 August 2019

वेडी माणसं

वेडी माणसं

खरखरीत हाताची..मनाने मनाला आधार देणारी
उबदार मायेची चादर..  अंगावर पांघरणारी
अस्वस्थ मनं तळहातावर जपणारी ...
ती म्हातारा म्हातारी आता दिसणार नाहीत ...

प्रत्येक घरा घरात होती ती  ...
उबदार मायेच्या हाता  हातात होती ती ...
ए आजा.... का कावलास तू  ...
मी हाय इथ.... म्हातारा कळवळून  म्हणायचा
 तू खा आधी भाकर मेतकूट ..म्हातारी मायेने म्हणायची
न सांगता डोळ्यातील भाव टिपायची
मनाची भुक लागो नाहितर....
पोटाची भुक लागो....
तडक म्हातारया  म्हातारी  कडे जायचे ..
appointment  ची पध्दत नव्हती तेव्हा ..
हृदयाची कवाड आणि घराची दार  सताड उघडी ....

आता  दारावर टकटक करतानाही भिती वाटते ..
कस बोलायच...काय बोलायच खूप जुळवा जुळव करावी लागते
 खूपच औपचारीक झाली आहेत नाती अलीकडे ..
नात्यातही  appointment ची कल्पना आली आहे..
थरथरणारा म्हातारा..थकलेली म्हातारी ...
त्या   विना आपल्याच घरात अनाथ झाली आहेत..

देव देव देवाचा श्वास वेठीस धरणारा ...
भाबड़या  म्हातारया म्हातारीला देवाचं भय दाखवत
आपल उखळ पांढर करणारी मग पिढी आली
थोडी व्यवहारी....थोडी शहाणी .
अन आपल्याच व्यवहाराची   शिकार झाली...
कारण त्या पुढची पिढी अजुनच कोरडी निघाली..
त्यांची नाती आभासी...आभासी जगातली..
आभासी प्रेम आणि आभासी अश्रू त्यास उमजले नाही
भाबड़या    म्हातारयाचे  .... हतबल हातारीचे रुपेरी अश्रू   मन जळून  मग  त्याच्या  नयनचा भाग झाले

हे शेवटचे अश्रू  आता....जगावेगळ्या व्यथा
जुन्या वेड्या पिढीच्या ...भावनेच्या वेड्या कथा
आता त्यातल संचित कधी  उरणार नाही....
दोन थेंब ओलाव्याचे अंगावर कधी उडणार नाहीत ..
मिळेल माया कधी आभासी जगातली...लव यू वैगरे
मायेची उब त्यात...कधीही तुम्हाला जाणवणार नाही..
आता मन व्यक्त करायला  शब्दच लागतील...
शब्दावाचून  मन ओळखणारी ...
म्हातारा म्हातारी आता कुठे सापडणार नाही

म्हणून...

जखमा आता भळभळ वाहणार  नाहीत..
अश्रू सहज झरयासारखे  ओघळणार नाहीत ...
शब्द राहतील गोठून ...किंवा भटकतील आभासी जगात
त्यांच्या  कुशीत आपल्या कथा आता उलगडणार  नाहीत
स्वार्थाने असे  जाळे विणले  आहे ...
भाबडे नाते त्यात विरुन  गेले आहे..
काय म्हणतात तुमच्या शब्दात...
  practical  व्यवहारी जगणे आता रीत झाले आहे..

आणि आता तसेही

पुर्वीसार्खी खरखरित हाताची  म्हातारी
आणि वेडा  निष्पाप म्हातारा ...
त्यांचे उबदार हात  आता उरले  नाहीत
त्यासाठी कदाचित तुम्हाला अनाथाश्रमात जाव लागेल..
किंवा सापडल्या  नेटवर तर  कथा वाचाव्या लागतील..
घ्या एकदा भेटून जमलं  तर ...
कारण  अल्लाऊद्दिन ऊद्द चा जादूई दिवा घेऊनही...
मनाने मनाला जपणारी ती वेडी माणस तुम्हाला
पुन्हा शोधूनही  सापडणार नाहीत...

अजय भोसले




No comments:

Post a Comment