Sunday, 22 September 2019

पाऊस

निळा पाऊस,तांबडा पाऊस,पांढरा पाऊस, हिरवा पाऊस..
इन्द्रधनूची शाल ओढून रंगात रंगलेला झिमझिमणारा  पाऊस...
कुणाला नको नकोसा ...
कुणाला हवा हवासा पाऊस ......
राधेला किसनाची याद देऊन...व्याकुळ करणारा पाऊस...
खळखळणारया झर् यांना ...डोंगराआडून साद देणारा पाऊस..
कुणाच्या डोळ्यातून वाहणारा..
कुणाच्या डोळयात नाचणारा पाऊस..
ठुमकत निघालेल्या सरितेला..दर्याची भेट घालून देणारा पाऊस..
धुक्यात लपलेलया मेघांशी ....लपंडाव खेळणारा पाऊस
कुणाची आस पाऊस...
मनाचे भास पाऊस..
असा हा पाऊस....
कधी रंगात रंगवणारा ..
कधी रंगहीन करणारा ...
कधी दवबिंदूंची माळ उसवणारा ...
कधी आपल्याच सरीत श्वास कोंडवणारा पाऊस..
ओला पाऊस...
सुखा पाऊस..
कुणाला हवाहवासा...
कुणाला नकोनकोसा पाऊस....

                                          

No comments:

Post a Comment