Sunday, 22 September 2019

सरिता



मृगनयनी सुहास्य वदनी
मंगल हृदयी चंचल ती ..
ती भावनांचा  गुंता ...
दवबिंदुंची अनंत  माळ ,
स्वः विश्वात रममाण ती....

कधी शांत दर्यापरी गुढगम्य ती ...
कधी विशाल डोंगरापरी सौम्य ती ..
कधी शंकराचा रूद्र तांडव ती ..
कधी पार्वतीसम प्रेमळ माता ती...
इंद्रधनूचे सप्तरंगी  भावतरंग ती..

सोडून मागे  हिरवे माहेर ..
डोंगर अढळ , आभाळ सोबती
चंद्र धवल तिच्या साक्षीला..
दर्या अनंत कृष्ण सखा ...
भेटीस त्याच्या अधीर ,व्याकुळ ती

कृष्ण सख्याची अथांग दरयाची
 धुंदावल्या बासुरीची वेडी सरिता ...
श्यामसख्याचा निळा रंग ती...
षडजांच्या सुरांची खुळी खुळी,
तटिनी ती, बावरी राधा ती ..

का कोण जाणे ...
जरी हास्य तिचे मोतेरी..
जरी हास्य तिचे रुपेरी,
खोल खोल मनात ...
मनातल्या डोहात ..
कुठेतरी अस्वस्थ..
कुठेतरी संभ्रमी...
कुठेतरी अतृप्त ती...



       

No comments:

Post a Comment