Sunday, 22 September 2019

येवा कोंकण अपलोच असा








      निसर्ग, उच्च /कनिष्ठ मध्यम वर्गीय आणि निम्न स्तर याची भौगोलीक व सामजिक रचना म्हणजे कोंकण . भारतातील सर्वसाधारण रचना अशीच असली तरी निसर्गाची साथ सर्वानाच लाभली आहे अस नाही. निसर्गाचा आदर करत , तो जे देईल त्यात समाधान मानणारा, फणसासारखा खडबडीत वाटणारा परंतु आतून मऊ लुसलूशीत गरयासारखा ...निसर्ग त्याला  देतोही भरभरुन...हिरवी माया ...कधी झाडावरुन आंबे ,फणस, केळी ..शेतितून तांदूळ ...काही नाही तर पाण्यात हात घालावा मासे देईल...दगडाखाली हात घालावा खेकडे देईल...गरजा कमी समाधान मोठ...आत्महत्या वैगरे असा प्रकारच नाही..

      कोंकणातील सण म्हणजे जगण्याचा उत्सवच .त्यासाठी कोकणी माणूस आवर्जून कुठूनही येतोच.तस अद्योगीक प्रगतीमुळे कोंकण शहराच्या  जवळ आलं आहे.अनेक ठिकाणी अजूनही चंद्रावरचे खड्डे तुमचं  कंबरड मोडायला रस्यावर दारुड्या माणसारखे आ वासून चहुकडे लडबडलेले असले तरी त्याला जबाबदार असलेल्यांची आय माय काढत आमचा कोकणी माणूस मार्गस्थ होतो . (आपल चांद्रयान कदाचीत हयच गावतलय)वर कार्य करुचा म्हटल तर विघना येतलीच अस सहजपणे म्हणतो.लाल गाडी म्हणजे त्यांची सखीच. आपल्या प्रियेसारखी तिची प्रतिक्षा करतात.त्यांची ती सखी लाल प्रिया खड्डयातून त्यांना चेंडूसारखी वरखाली फेकत असली, वळणावर घुसळत असली तरी आमका फिकीर ना...जाऊचा म्हणजे जाऊचा..तू आमचे पाय सूजव नाही तर नाही तर अंग सूजव ....बापे फेर धरतलेच आणि बाया फुगड्या खेळतल्याच...

       शहरातल्यांना सणाची गोडी लागलीय. तो कुठलीतरी धार्मिक पुस्तके वाचून, कुठलेसे वीडियो पाहून  देवाला दागीन्यांनी,  हार फुलांनी मढवून  जीव नकोसा करुन टाकतो.म्हणे सर्व विधिवत व्हायला हव....तुमची श्रध्दा असेल तर जरुर कराव .... येथे तात्पुरता शहरातून पुस्तकी शहाणपण घेऊन आलेला श्रीमंत माणूस .. (येथील श्रीमंत म्हणजे शहरातील कनिष्ठ मध्यमवर्गीय  ,तो शहरात सेलीब्रेटीच्या घरातील गणेशाच्या साधेपणाचे गोडवे गात असतो. श्रीमन्ती सापेक्ष असते अस म्हणतात.तुम्ही ज्या परिप्रेष्यातून तुम्ही पहाता तशी ती असते. )..मग तो निम्नस्तरीय वर्गकडून ऊसना भाव घेतो... विधिवत कार्य करण्यासाठी  ...हार  घालणे, दुर्वा आणणे, मोदक बनवणे वैगरे वैगरे..आणि हा भाव देवाला समर्पित करतो. विघ्न नको म्हणून सर्व समजूतीने होत रहात. सर्व घरात थोड्या फार फरकाने हेच. पण येथील जमिनीवरचा माणूस काळाच्या पुढे  आहे.त्याची निसर्गाची  सच्ची मैत्री आहे.अगदी निसर्गा कडून केळीचं पान, दोन चार फुलं घेऊन निसर्गाशी तादाम्य पावत  , आतले भाव ओतून सण साजरा करतो.देव भक्तीचा भुकेला हे संतवचन त्याला पक्क कळलं आहे.असो सण महत्वाचा.

     . निसर्ग नटतो त्याच्या कैक पटीने बाया मुली नटतात. झरे थिरकतात त्यापेक्षा त्या थिरकतात. नद्या आणि बाया ठूमकत निघतात.किशन कन्हय्ये गोल फेर धरतात.शहरातील पोरं मातीचा गंध अनुभवतात. मोकळ्या रानात, काठावरच्य नदीवर, डोंगराच्या कुशीत वार शिरल्यासारख आणि पायाला भिंगरी लागल्यासारखी हूंदडतात. मोकळं वार  अंगात भरुन घेतात.गणेशजी येतात मग सोबतीला गौराबाई. मुखवटा, तेरड्याच्या फांद्या बस.या सामग्रीवर तिची सुंदर  आरास सजविली जाते.तिला सजवणे हा एक सोहळा असतो.

     कोंकणात सामाजिक समानता निसर्गातून आलेली...अगदी उपजत...स्त्री पुरुष सहजपणे वावरतात....संविधान न वाचताही...सामाजिक दरयाही ही लोप पावत चालल्या आहेत.याच कारण निसर्ग  .त्याला तो वचकून असतो .निसर्ग त्याचे पाय जमिनिवर ठेवतो.तोही या मातीत ममतेने पाय रोवून उभा आहे. निसर्ग कोणताही भेदभाव करत नाही.येथला माणूस निसर्ग वाचतो त्याला निसर्गाने सांगितलेल आकलन होत. निसर्गाच्या आणि चांदण्याच्या साक्षीने तो त्याच्या रंगात मिसळून जातो. हा निसर्गाचा उत्सव अनुभवयाचा असेल तर येवा कोंकण आपलोच असा....


No comments:

Post a Comment