खड्ड्यांनी खड्ड्याला आम्ही भागले
आवेग अवचित ऊरी ठेविले
जीवन आमुचे खड्डे उमजून ...
जीवनात परी खड्डे राहीले...
चिंता आम्हा आमुच्या बाप्पाची
कैलासावरील दूर रस्त्याची..
खूप लांबचा पल्ला त्याचा..
त्यासही चंद्रापरी खळग्यांनी ग्रासले..
बाप्पाही आमुचा झाला बेजार ..
त्यात मूषकरावांचा असहकार
करता निर्मळ निःस्वार्थ आर्जवे
कनवाळू बाप्पा घरी आले ..
मग कितीक लिहिल्या कथा आणिक
कित्येक कविताही खरडल्या ...
भाव साहेबाच्या चेहर्यावरचे परी
नित्यनेमे तसे कोरडेठाक राहिले
धवल वस्त्रातील देवाधी देव ..
एवढेच आमुचे तुम्हा आर्जव
काळ्या काचेतून पहावे कधी ...
स्वप्न इवले इवले आमूचे ,
नित्य नित्य जे भंगून राहिले ..
No comments:
Post a Comment