दोन भावना बळे सारुन...
चार शब्द उधार घेउन ...
तिची व्यथा कळणार कशी
तुक्याची आवली ती ...
कधी हिमालयाची सावली ती ..
जेव्हा माणसात देवपण शोधाया..
विठठला मागे तुक्या धावत होता..
कर्माचा साधा विचार विठठळ
आवलीकडून शिकत होता...
तुक्या संत जाहला आणि
आपली प्रतिभा पदरात बांधत...
कधी तुक्याची आवली तर..
कधी हिमालयाची सावली झाली ती ..
कुठलीही कविता उलगडा ...
सुप्त पुरुषी मनं पडताळा..
सोईस्कर अशा परिघी कोषात ..
तिची प्रतिभा गोंजारलेली ..
कधी आवली आवली म्हणून
कधी हिमालयाची सावली म्हणून ..
जिजाऊ , सावित्रीची प्रतिभा ...
या पुरुषांना झेपलीच नाही...
नाही तर आवली, सावली..
अशी शब्दांची खेळी खेळत..
पुन्हा तुक्याची आवली आणि
हिमालयाची सावली झाली असती ती ..
यांनी बहरुच दिला नाही ..
तिच्या प्रतिभेचा पदर.....
बुद्धीची देवताही गणेश आणि
सरस्वती कायम उपेक्षाच राहिली ..
पुन्हा तुक्याची आवली ती..
हिमालयाची सावली झाली ती ...
No comments:
Post a Comment