मनाचा थांग न लागणारी माणसांची मनं आणि खोल दरया, खळखळणारे झरे, निसर्गाची हिरवी पैठणी नेसलेले डोंगर त्यावर मोतीदार वळणावळणाची नक्षी ......नुकतच शिडकाव्याने तयार मातीचं ताजं अत्तर ...अंगाअंगात मुरवत बाप्पाला भेटायला जाणं एखाद्या वारी पेक्षा कोंकणवासीयांसाठी स्वर्गीय अनुभूती...निसर्गाची मुक्त उधळण...साधी माणसं ...निसर्गान जे दिलय त्यात समाधान मानणारी ..जास्त म्हातारा म्हातारीच असतात गावात..मन टेकलेले...पाठ वाकलेले ..सांजवेळ जवळ येत चाललेली...दूर रस्त्यावर शोधत असतात आपला भुतकाळ....डोळयात अंधुकसा अंधार ...सणासाठी येणा रया मोटारींचे दिवे मोठे मोठे होऊ लागतात..हळुहळु मनावरच मळभ दूर होऊ लागतं ....डोळे चमकू लागतात...अंधारात प्रकाशकण वेचू लागतात....डोळ्यातून चेहरयावर आशेचे किरण ओघळू लागतात....पुन्हा दिवे दिसेनासे होईपर्यंत....
No comments:
Post a Comment