मी गणेश बोलतोय ....तुमचा लाडका बाप्पा....तुम्ही मला आवडीनं पुजता ....बूद्धीची देवता म्हणून ...अनेकदा बुद्धी बाजुला ठेवून....कशी समजूत घालू बाबा तुमची ...चार पुस्तकं ठेवली असती माझ्या समोर तर रात्रभर वाचत बसलो असतो...जीव घुसमटून गेलाय रे...या अलंकारांनी ...हारांनी ...धूप...अगरबत्त्या .... रसायनयुक्त सुगंध आणि अजून कसले साज माझ्या अंगावर लादलेत त्यांनी...पण तुम्ही काय ऐकणार नाहीत...कर्ज काढून सण साजरे कराल....अरे बघा जरा आजूबाजुला...श्रीमंत लोकांकडे...सेलीब्रेटींकडे ...सहज लाखो रुपये उधळू शकतात....पण किती साधी मुर्ती स्थापना असते....तिही पर्यावरण युक्त...स्पृहाजी गणेश बीजाची संकलपना कळकळीने रुजवू पहातायेत...काय आहे गणेश बीज? मातीचा गणेश...बीजाचे अलंकार ल्यायलेला...त्याची स्थापना कुंडीत करायची....विसर्जन कुंडीतच....त्यातून उगवणारया रोपाचा सुगंध तुमच्या महागड्या सुगंधालाही नाही ....माझ ऐकायच तर ऐका...निदान तुमच्या श्रद्धा दुसरांयावर लादू नका...त्यातून क्लेश उत्पन्न होतात...पवित्र वातवरण कलुषित होत...निसर्ग/देव फक्त पवित्र, निर्मळ,मंगल वातावरणात वास करतात....तूक्याने केली ती भक्ती...फक्त .वाणीने....तुम्ही आज काय करता आहात...परंपरेच्या नावाखाली घोडे उधळताय....तुक्यान ,ज्ञानानं सांगितलेली ज्ञानार्जनाची परंपरा कुठे गेली....कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेशु कदाचन...कर्माची परंपरा आपली...कर्मकांडाची नाही ...कर्मच केले नाहीत तर कसले नवस सफल होणार...मी निर्गुण,निराकार...कर्कश आवाजात भजनं करताना त्याचा अर्थ तरी समजून घ्या...निसर्ग म्हणजे देव...देव म्हणजे...निसर्ग त्याला दुसरा आकार नाही...तुम्ही झाड तोडलीत की तो पूर आणतो ...तुम्ही पाणी वाया घालवलत की वैराण करतो...तुम्ही निसर्गाला वरचढ होऊ पहाता...तो ममतेने सांगू पाहतो काही...झुळझुळणारया वारयातून....नाही ऐकत तुम्ही...मग देतो एक रट्टा...शेतकारयाचा मालाला भाव देताना ....गरीब भाजीवालीची भाजी घेताना...तुम्ही घासाघीस करता...आणि ज्याचा मला काहीच उपयोग नाही अशा महागडया निर्जिव वस्तू माझ्यावर लादून माझा जीव नकोसा करता...संतानी सांगितल देव माणसात...देव निसर्गात ...तुम्हाला ऐकायचं तर ऐका पण बाबांनो निदान या निर्जिव अलंकारानी माझा जीव घुसमटवू नका..जमलं तर द्या दोन पुस्तकं गरजूना..जमलं तर द्या भाव शेतकरयाच्या मालाला...जमलं तर लावा दोन रोपटी अंगणात...बुद्धी देवता प्रसन्न व्हावी अस मनापासून वाटत असेल तर बुद्धीची जोपासना करा ...मला अलंकार नको पुस्तक द्या...मला धुप नको रोपट द्या...
No comments:
Post a Comment