"Shallow hal " नावाचा एक चित्रपट पाहिला होता. hal फक्त आकर्षक महिलांना डेट करायचा.त्याच्या दृष्टीने शारिरीक सौंदर्य प्राथम्याच होत.तो रोझमेरी नावाच्या एका स्त्रीच्या प्रेमात पडतो. खरतर ती लठ्ठ असते.परंतु ,लिफ्ट मध्ये एक गृहस्थ त्याला तिचे आन्तरीक सौंदर्य बघण्यास संमोहित करतो. रोझमेरी मनाने खूप चांगली असते.तिच्या निष्पाप आन्तरीक सौंदर्यामुळे त्याला ती खूप आवडू लागते. परंतु संमोहन उतरलया नंतर त्याला धक्का बसतो.तो डिप्रेशन मधे जातो. तो तिला टाळू लागतो. त्याला मग शारिरीक सौंदर्यापेक्षा मानसिक सौंदर्याचे महत्व पटते .चित्रपटाचा शेवट गोड होतो.
परंतु ,प्रत्यक्ष आयुष्यात अस होत असेल का? मनुष्य हा सर्वसाधरणत: मनाच्या सौदर्यापेक्षा भौतिक सौंदर्याने आकर्षित होत असतो .हे भौतिक सौंदर्य काहीकाळ दिसेनास झाल तर तो तितक्याच आसक्तीने प्रेम करेल का? पुरुषाच प्रेम भौतिक असत तर स्त्रीच भावनीक हे मानसशास्त्राने स्वीकारलेल तत्व आहे.मला इथेच मुबईत घडलेली एक कथा आठवली.
एक राजा राणी मुंबईच्या छोट्या फ्लैट मधे आनंदाने रहात असतात.दोघही नोकरीला घरात सुबत्ता. तो तिला आवडायचा.ती त्याला आवडायची . तिने आपले सर्वस्व त्याला समर्पित केले होते. ती त्याच्या कुठल्याही मागणीला नाही म्हणायची नाही.नोकरीचा झेंडा मिरवायची नाही. तो राणी राणी म्हणताना थकायचा नाही. ती हवेत विहरायची. जे अनेक स्त्रियांच्या वाट्याला आलेल घरकाम चुकत नाही ते ती कुरकुर न करता करायची. तो फक्त पहायचा. त्याला काय हव नको ते सारखी पहायची .आजारी असो नाहीतर नसो. त्याच्या प्रेमळ शब्दांनी विरघळायाची. मूड नसला तरी मागणी पुर्ण करायची. आताशा तिच वजन वाढल होत . तो तिला जोग्गिंग ला घेउन जायचा.व्यायाम करवून घ्यायचा. तिला केवढ कौतुक . तिच्या अपेक्षा थोड्या होत्या . त्या सर्व पुर्ण होत असल्यामूळे आपल्या परिघात ती खरच खूप आनंदी होती.
पण आता तर ती आजारी पडू लागली होती.ओब्सेसिटी मुळे तिच वजन प्रमाणाबाहेर वाढ़ु लागल तसतस राणी राणी ऐकू येइनास झाल. त्याचे उबदार स्पर्श लुप्त झाले . ती भांबावली बिचारी. तिला वाटलं मी तर तिच आहे मग त्याला अनोळखी का वाटतेय. तिन विचारायच ठरवल . "का अस वागतो आहेस तू. रोज मला वेळ काळ न पहाता हट्टाने जवळ घेणारा तू मला आता टाळतो आहेस?" तो म्हणाला..".तुला व्यायाम करायला सांगितल तुला interst नाही.आळशी आहेस तू ."ती म्हणाली ..."त्याचा काय संबंध...हा आजार आहे वजन वाढणाराच ..." तो म्हणाला...."बघ स्वताकडे जरा" ती म्हणाली ..."मी तर तशीच आहे " तो..."काय तशीच आहे....बघवत नाही ...बेडौल झाली आहेस.." तिला धक्का बसला ..."पण माझ मन तसच आहे ..पुर्वीसारख " तो ...." काय करु तुझ्या मनाच ..त्यान सुख मिळत नाही " ती आता कोसळली होती .." सुख फक्त शारिरीक असतं का " तो..."मग दुसर काय असत" ....ती ...." म्हणजे माझ्याकडून व्यायाम करुन घेण ,तुझी काळजी नव्हती ...गरज होती"
तो ... "तसच समज "
. ती निराशेच्या खोल गर्तेत गेली होती.तिने त्याच्या वाटेल त्या मागण्या पुर्ण केल्या होत्या .शारिरीक असो वा अन्य काही .फक्त त्याच्यासाठी . फक्त शरीराचा आकार बदलल्याने आता ती नकोशी झाली होती ,पण आत्मा तर तोच होता ना. तिच्या आसवांनी उशी भिजली होती. तिच्या मनाची कोंड फुटत नव्हती . ती मनाशी एकटीच सारखी बडबडत होती "अरे पण मी तर तीच आहे ना.....अरे पण मी तर तीच आहे ना "

No comments:
Post a Comment