Thursday, 8 May 2025

हिवरे बाजार




पार्श्वभूमी


                हिवरे बाजार हे अहमदनगर जिल्ह्यातील शिवकालीन नाते असलेलं  एक  समृद्ध  गाव . परंतु १९७२ च्या दुष्काळानंतर या गावाची स्थिती बदलली . दारू ,शिक्षणाचा अभाव यामुळे गावाला अवकळा आली . १९८९ नंतर पोपटराव पवार यांच्या नियोजनबद्ध  विकास कार्यक्रमामुळे गावाचा विकास झाला असून आता हे गाव एक आदर्श गाव म्हणून प्रसिद्ध झाले आहे . शाळा , ग्रंथालय , विहिरी ,झाडे   यांना महत्व दिल्यामुळे जगभरातून लोक गावाचा अभ्यास करण्यासाठी येतात . 


गावातील उपक्रम

शिक्षण

व्यसनमुक्ती 

सेंद्रिय शेती 

पाणलोट विकास 

पशुधन विकास 

महिला सक्षमीकरण 

सौर ऊर्जा 

परिणाम

पाण्याची उपलब्धता वाढली

सुधारित पीक उत्पादन (300%)

वाढीव उपजीविका (50% उत्पन्न वाढ)

चांगले शिक्षण (९० टक्के उपस्थिती)

सशक्त महिला (30% बचत गट सदस्यत्व)

ऊर्जा खर्च कमी (80%)

     प्रशासन, धोरण  आणि गाव 

            राज्याचा विकास करताना धोरण आखणी हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे . त्यानंतर अंमलबजावणीचा भाग  क्षेत्रीय पातळीवर येतो . शासन  धोरणाची आखणी करत असताना  समन्यायिक तत्वाच्या आधारे आखणी करत असते . परंतु एका गावाचा विकास होतो आणि अन्य गावाचा नाही याचा अर्थ अंमलबजावणीतील उदासीनता हाही एक भाग दिसून येतो . सरपंचाशी झालेल्या चर्चेतून असे दिसून आले की , ग्रामीण पातळीवरील समस्यांचा अभ्यास न करता , स्थानिक लोकांची मते विचारात न घेता धोरणे आखली जातात . आता इथे प्रश्न येतो मंत्रालयीन धोरण आखणी पद्धतीचा . पूर्वी कोणतेही धोरण आखताना संबंधित विषयातील तज्ञाची समिती नेमून त्या आधारे धोरण आराखडा तयार होत असे . कोणतेही धोरण पूर्ण  राज्यावर परिणाम करणारे असल्यामुळे मला धोरण आखणी करताना खालील तीन मुद्दे विचारात घ्यावे असे वाटते . 

१}  क्षेत्रीय तपासणी 

२}  तज्ञांचे  मत 

३} प्रशासनिक पातळीवर सर्व अंगाने चर्चा 

४} धोरण आखणी 

उपाययोजना 

          गाव पातळीवर  शासनाच्या अनेक योजना आहे . अशा सर्व योजनांची एकत्रित माहिती उपलब्ध करून त्याबाबत ग्रामपातळीवर सजगता वाढविणे आवश्यक आहे . शिक्षण , सजगता , अंमलबजावणी या त्रिसूत्रीचा आधारे हे साध्य  करता येईल.  यातील लोकसहभाग हा अत्यंत महत्वाचा घटक आहे.


Ajay Bhosale.

No comments:

Post a Comment