Friday, 9 May 2025

मुखवटे

     

                                       


   मी ज्या सध्या ज्या सोसायटीत राहतो तेथे अनेक वृद्ध जोडपी ,काही एकटे वृद्ध राहतात . बहुतेकांची मुलं परदेशात . अलीकडे सोसाटीच्या नोटिसबोर्ड  वरून कळत होत ,काही वृद्ध जग सोडून गेले . जे गेले आणि जे उरले आहेत त्यांचं इथं कुणीही नाही ,एकटेपणाशिवाय !सकाळी दिसतात . मुलं इथं नाहीत याची त्यांना खंत नसेल असं नाही .परंतू प्रसन्नतेचे मुखवटे लेऊन फिरत असतात . कमालीची maturity .       

भौतिक  संपन्नता आहे त्यांच्याकडे पण ते संपन्न आहेत का ? अर्थात  आपण त्यांच्या मनात डोकावू शकत नाही .प्रसन्नतेच्या मुखवट्याआड दिसणाऱ्या खिन्नतेवरून फार तर अंदाज बांधता येऊ शकतात . तुका म्हणे आता तुझी जवळीक ,तुजविन आता मज कोण आहे पांडूरंगा !

अजयभोसले .

No comments:

Post a Comment