Monday, 27 July 2015

प्रपोजल

सामाजिकदृष्ट्या  सुस्थापित, सुसंस्कृत व्यक्ती एका वेश्येच्या प्रेमात पडते , अशी नाटकाची कथा आहे . एखाद्याच्या अनुभवातून आपण स्वतः गेलेलो  असलो तर त्याच्या वेदनेची तीव्रता जाणवू शकते . त्या व्यक्तीची भूमिका,वागण , विचार समजून घेता  येऊ शकतात. एखादि व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम का करते, हे तिऱ्हाईतपणे  आपणास समजू शकणार नाही.वेश्येवर कुणी प्रेम करू शकतो का? का करू शकत  ? .................. याची उत्तर तुम्हाला "प्रपोजल" या नाटकात मिळतील.  

            संपूर्ण कथानक एका ट्रेनच्या डब्यात घडत . रंगमंचावर ट्रेनचा पूर्ण डबाच उभारण्यात आला आहे . या  डब्यात नायक व नायिका भेटतात अन नायकाच्या एकतर्फी प्रेमाची कहाणी सुरु होते. 

         प्रेम कुणाला नको असत ? परंतु नायिकेला वास्तवाच भान आहे . समाजाच दांभिक स्वरूप तिला  ठावूक आहे . आपल्या वासनेची भूक मिटवण्यास येणारा "नीतीमान "  समाज तिला स्वीकारणार नाही, याची तिला कल्पना असल्यामुळे नायकाच्या "प्रपोजल" ला प्रतिसाद देताना तिची प्रचंड भावनिक घालमेल होतेय. 

       अादिती सारंगधर यांनी ही , भावनिक घालमेल उत्कटपणे साकारली आहे. तसेच नायिकेच्या भूमिकेतला बेफिकीरपणा त्यांनी उत्स्फुर्तपणे उभा केला आहे.   तिच्या स्त्री मनाची आंदोलन त्या नैसर्गिकरीत्या व्यक्त करतात.  नायकाने , नायिकेच्या भूमिकेला उत्तम साथ दिली आहे . 

      love is  the  marriage of  true minds. दोन निष्पाप  मनांची ती अभिव्यक्ती असते. त्यासमोर इतर भौतिक गोष्टींना काही स्थान नसत. ट्रेनच्या डब्यात सुरु होणाऱ्या या दोन सच्च्या  मनांच्या प्रेमकहाणीच्या प्रवासात आपण नकळत प्रवाशी होऊन साथ देऊ लागतो . 
                

No comments:

Post a Comment