Tuesday, 28 July 2015

लक्ष्मीनारायण त्रिपाठी

             "मी हिजडा मी लक्ष्मी " हे पुस्तक बऱ्याचदा  चाळल अन तसच ठेवलं … काय वाचायचं याच्यात? या विचाराने . जेव्हा लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांची टीव्ही वरची मुलाखत पहिली …  त्यांच्या विचारांची प्रगल्भता , खोली पाहून चाटच पडलो . खजील झालो . बाह्य स्वरूप पाहून कोणतीही माहिती न घेता मत तयार करण्याच्या वृत्तीने…  मुलाखतीतील एक वाक्य मनावर चांगलच बिंबल …" जेव्हा तुम्ही achieve  करता तेव्हा लोकांचा दृष्टीकोन बदलतो " लगेच दुसऱ्या दिवशी हे पुस्तक विकत घेतलं . 
   
           "हिजडा " हा शब्द फार बोचरा वाटतो . transgender (टीजी) हा शब्द ठीक आहे .टीजी (पुरुष शरीर , स्त्री मन ) मधील काही जण "हिजडा " बनण्याचा पर्याय स्वीकारतात . ही प्रक्रिया खूप विचित्र व क्लेशदायक आहे . मुळातच या प्रक्रियेतून जाण्याची आवश्यकता काय ?...आहे  त्या नैसर्गिक स्वरुपात का जगता येत नाही ?… याला कारण आपला समाज … समाजात  अशा टीजीना फार अवहेलना , अपमान सहन करावे लागतात . सुरक्षितता नसल्यामुळे हे घडत . मनुष्य हा समूहाने राहणारा प्राणी  आहे . जिथे त्याला सुरक्षित वाटत , तिथे तो आकर्षित होतो . 

          शरीर पुरूषाच परंतु भावना स्त्रीच्या. वैद्यकशास्त्रानुसार   हार्मोन्स , टेस्टाटेरोन च्या प्रक्रियेमुळे हे घडत . म्हणजे जन्माला येणार मुल कस होईल हे आपल्या हातात नसत . या आयुष्यात आपणच त्याला ढकलत असतो . त्यामुळे त्याची जबाबदारी आपली आहे. सगळेच जण  ही जबाबदारी पार पाडतात अस नाही.लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांच्या सतत पाठिशी उभे राहणारे आई -वडील , कुटुंबिय यांचे कौतुक वाटत. लक्ष्मीनारायण  यांचा प्रवास खडतर होताच , त्यातून त्यांनी जे achieve केल , त्यामुळे समाजाचा दृष्टीकोनही बदलू लागला .परन्तु या प्रवासात साथ देणारे आई -वडील , कुटुंबिय यांनी मनात घर केले आहे . ख़रच घरातले सगळे पाठिशी  असतील तर काहीही achieve करता येईल . 

No comments:

Post a Comment