Monday, 31 August 2015

दोन स्पेशल

     




           भूतकाळातील प्रेयसी अचानक वर्तमानात समोर आली तर …. कितीही राग असो …. काही कारणामुळे एकमेकांना सहवास मिळालेला नसो …. याबाबत गैरसमज असोत …. एक सुखद लहर शरीरातून दौडू लागते .   नकळत मागच्या घटनांचा वेध घेणे सुरु होते . फार सुंदर आणि निष्पाप भावना असतात . 

           नायक एका वृत्तपत्रात उपसंपादक आहे . एका बिल्डर च्या निकृष्ट   बांधकामामुळे तीन व्यक्तींचा बळी जातो . त्याला ती बातमी द्यावयाची अहे. ती बातमी देऊ नये म्हणून बिल्डर एका महिला अधिकाऱ्याला  त्याच्याकडे पाठवतो .  ती महिला अधिकारी म्हणजे त्याची गतकाळातील प्रेयसी . हळूहळू आठवणींचे धागे  जसे उलगडू लागतात , तसे  राग, प्रेम , जिव्हाळा, काळजी  याचे तांडव सुरु होते. भूतकाळात ज्याच्या सोबत भविष्याची स्वप्ने रंगवली … नियतीने ताटातूट केली … त्याच्याच हातात भविष्यकाळ असेल तर . प्रेम  , तत्व याच्या गर्तेत निर्णय घेण अवघड होत .

                    तिच्या दृष्टीने तिची नोकरी महत्वाची असते . घराची सर्व जबाबदारी तिच्यावर असते . त्याच्या दृष्टीने त्याची तत्व महत्वाची असतात . याची तिला जाणिव असते . यातून काही मध्यम मार्ग निघेल म्हणून ती भाबडी आशा बाळगून असते . काय होत तर .  प्रेम तत्वांना तिलांजली देत? तत्व आपली मुळ घट्ट रोवून उभी राहतात ? नेमक काय होत ? प्रेम , तत्व , काळजी , जिव्हाळा याच्या विविध छटा  उलगडून दाखविणाऱ्या भावाविष्कारात  आपण गुंतून जातो .  हा गुंता सुटतो कसा हे प्रत्यक्ष पहाणे मोहक आहे

दिग्दर्शक -क्षितीज पटवर्धन 

                     

No comments:

Post a Comment