पाऊलखुणा
रस्ता एकटा धुक्यात
करी आकांत जीवघेणा
लोभी डोळे नकळत
शोधती पाऊलखुणा
गंध तुझा न जाणे
कोठुन हा आला
घुसमट करून जीवा
सोडून पाऊलखुणा
नि:शब्द आसमंत
करी जीवाचा कालवा
जोडून टिपे तरीही
उरतील पाऊलखुणा
काय माझा गुन्हा
तुझीच धुंदी मना
माझे काही न आता
भिनल्यात पाऊलखुणा
No comments:
Post a Comment