Saturday, 31 October 2015

चमत्कार

               जीतला चिंता लागली होती . पैसे  संपलेले . आता पुढचे दिवस कसे काढायचे . सगळ मुलांच्या शिकवणीवर चाललेले . घर आणि शिक्षण . मित्रांनी दिले असते पण उधारी मागण उचित वाटत नव्हते. उगाचच एखाद्याच्या उपकाराच्या दबावाखाली बुजायला होत. पुढचा दिवस काय आजचा दिवसही काढण मुश्किल होत . मे महिन्यात नवीन विद्यार्थी  मिळण्याची शक्यता  नव्हतीच .  आणि आलेच तरी शिकवणीचे पैसे महिन्या अखेरीसच मिळणार . भ्रांत आज आणि उद्याची होती . परिस्थिती कोंडी करते तेव्हा आपण चमत्काराची आशा करू लागतो .  

                     जीत अगदी मेटाकुटीला आला होता . असहाय वाटू लागल्यामुळे त्याच्या डोळ्यात पाणी उभे रहिले. त्या पाण्यात दोन अस्पष्ट  आकृत्या त्याच्या घराच्या दिशेने येताना दिसल्या . त्याने डोळे पुसले . एक स्त्री आणि तिच्याबरोबर एक मुलगा होता . तिने नमस्कार केला अन बोलू लगली . " हा माझा छोटा भाऊ आहे . आम्ही कुवेत वरून आलो आहोत . तिथल्या  परिस्थितीमुळे सगळ सोडून याव लागल . शाळाही . आता इथल्या अभ्यासक्रमाप्रमाणे शिकवायचं तर याची तयारी करून घ्यावी लागेल .  आजपासूनच सुरु करा . मी आगाऊ फीस आणली आहे . हि घ्या . प्लीज नाही म्हणू नका"

No comments:

Post a Comment