आज तिने चाळीशी पार केलेली . वाढत्या वयाच्या खुणा दिसू लागल्या होत्य. स्थूलपणा वाढला होता . एकटच आयुष्य काढत होती . एकटेपणाला कंटाळलेली . मनातल व्यक्त करायचं तर कुणाजवळ . तारुण्यात खूप सुंदर दिसायची . उमलत्या वयातही तिने व्यवहार पाहिला होता . लग्नासाठी तिची एक अट होती . मुलगा उच्चपदस्थ अन एकुलता एक हवा . शिक्षण मात्र दहावी . परिस्थिती कनिष्ठ मध्यमवर्गीय घरातील. सौंदर्याच्या फाजील आत्मविश्वासावर आभाळाएव्हढ्या अपेक्षा होत्या .
मुल येत होती . लग्न हा व्यवहार आहे . सगळच पाहिलं जात. तुमची परिस्थिती , समाजातील स्थान , शिक्षण सर्वच . तिच्या अपेक्षेप्रमाणे नसलेल्या मुलांना ती नाकारत होती . तिच्या अपेक्षप्रमाणे मात्र काही होत नव्हते. काळ जात होता . वय वाढत होते. आता तर घरातले सगळेच वैतागले होते . तिचा पीळ काही सुटत नव्हता . आज एकटेपणाच्या खोल भोवऱ्यात मात्र ती हादरली होती . सगळ्यांच म्हणण तिला आठवत होत . पण आता वेळ निघून गेली होती . "अपेक्षा मर्यादेपेक्षा जास्त ठेऊ नकोस ."
No comments:
Post a Comment