Sunday, 1 November 2015

बिल गेटस

                            बिल गेटस . जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक . काय असत यांच्या यशाच गमक . हे त्याच्यांच खाली विचारावरून स्पष्ट होईल . 
                  if you are born poor , its not your fault, But if you die poor , its your fault. 

                     जन्म २८ ऑक्टोबर , १९५५ . सहज म्हणून या तारखेची रास  पाहिली . स्कोर्पिओ . या राशीचे वैशिष्ट्य म्हणजे महत्वकांक्षा . हे वैशिष्ट्य त्याच्या स्वभावात पुरेपूर उतरलेल. 

                यशस्वी व्यक्तींच्या बालपणाच खूप कुतूहल असत . नेमक कस असत याचं बालपण ? आजूबाजूचे वातावरण ? असे काय घटक असतात ज्यामुळे  ते पुढे जगावेगळ काही करून दाखवतात . त्यांच्या घराण्यात संगणकाचा काही वारसा होता काय? 

                वडील व्यवसायाने वकील . घराण्यात संगणकाची तशी काही पार्श्वभूमी नाही . यशस्वी व्यक्तींचे निरीक्षण केले असता लक्षात येत,  त्याचं ध्येय निश्चित असत . एकाच गोष्टीचा ध्यास धरतात . मात्र तो ध्यास कोणता असावा याची स्वतःला वेळेवर जाणीव होण  फार महत्वाच असत . स्वत:ची अंत:प्रेरणा  काय हे केव्हा निश्चित कळेल , याबद्दल सांगता येत नाही . त्याला आठवीत असतानाच संगणकाची आवड निर्माण झाली . नुसती आवड पुरेशी नसते . व्यसन असाव लागत . ते त्याच्यात ठासून भारल होत . त्यावेळी संगणक महाग असत . परवडत नसत म्हणून भाड्याने घेतले जात . operating  system पूर्णपणे विकसित झालेली नव्हती . आजच्या सारखी ही  प्रणाली सोबत मिळत नव्हती . सामान्य लोकांना संगणक हाताळणे तसे अवघडच होते . 

                  कोणतेही यश हे एकहाती नसते . त्याच्या यशात मोठा वाटा आहे त्याच्याच शाळेतील परंतु त्याच्या पेक्षा मोठ्या असलेल्या पौल अलनचा . त्याचा जन्म २१ जानेवारीचा . म्हणजे राशीनुसार Aquarius. शांतपणाच प्रतीक . हा पौल केवळ संगणकात हुशार नसून त्याला संगीतातही चांगली गती आहे . तर बिल पूर्णपणे भौतिक अंगाने जाणारा . एक शांत तर दुसरा आक्रमक . दोघात एक साम्य म्हणजे …. वाचनाचे वेड . वाचन तुमच्या व्यक्तीमत्वात बहुढंगी बदल घडवते . 

                 बिलने प्रथम law  साठी प्रवेश घेतला होता . परंतु नंतर त्याने त्याच्या आवडत्या संगणक शास्त्राकडे मोर्चा वळवला . आयुष्यात आपला फोकस चुकू शकतो , तो वेळीच योग्य ठिकाणी वळविणे महत्वाचे असते .     

          सुरवातीची  DOS  प्रणाली  किवा त्या अगोदारच्या operating  system ग्राहकांना हाताळायला तितकीशी सोपी नव्हती . सर्व ग्राहकांना हाताळायला सोपी अशी प्रणाली विकसित करणे हि काळाची गरज होती . मोठी माणसे  काळाची गरज नेमकी ओळखतात . हे त्यांच्या कामाचे गमक असावे .Your most unhappy customers are your greatest source of learning . बिल गेटसच्या या विचारावरून लक्षात येत . ग्राहकाची नेमकी नस त्याने ओळखली होती व त्यांच्या गरजेला त्याने कायम प्राथम्य  दिले होते . 

                     बिल गेटचा १९७३ पासूनच प्रवास पाहिला तर ,प्रत्येक संधीच त्याने सोन कस केल हे लक्षात येत . प्रथम त्याला MITS या कंपनी कडून संगणक प्रणाली बनवायची ऑर्डर मिळाली . १९७६ मध्ये कंपनीचा ट्रेडमार्क नोंदणीकृत करण्यात आला . १९८१ मध्ये IBM  कंपनीकरिता , MS -DOS प्रणाली  तयार करण्यात आली . त्यानंतर यशाचा आलेख वाढतच गेला . १९८७ मध्ये थेट फोर्बसच्या श्रीमंत लोकांच्या यादीत तेही  वयाच्या ३१ व्या वर्षी . हा प्रवास थक्क करून सोडणारा आहे . त्यांच्या यशाचे गमक त्यांनीच लिहिलेल्या Business @ speed  of  Thought  या पुस्तकात वाचाव लागेल . 
                  

No comments:

Post a Comment