ढगही मुद्दाम गर्दी करून आले होते .
वाकुल्या करून आनंद जणू लुटत होते .
का त्यांचा असा अघोरी डाव होता ,
नेमका जेव्हा तुझा ठाव नव्हता .
भिजणारी पाखरेही मिश्किल हसत होती
उगाचच डोळ्यांना आज ती बोचत होती .
लाटांनीही का असा उच्छाद मांडला होता ,
मनातल्या तुफानानेही जेव्हा जोर धरला होता .
नभाला ढगांची बरी साथ होती
येशील कदाचित उगीचच आस होती
तू नव्हतीस म्हणून काय दंगा केला ,
एकटाच आसवांसवे किनारा धुंडाळला .
वाकुल्या करून आनंद जणू लुटत होते .
का त्यांचा असा अघोरी डाव होता ,
नेमका जेव्हा तुझा ठाव नव्हता .
भिजणारी पाखरेही मिश्किल हसत होती
उगाचच डोळ्यांना आज ती बोचत होती .
लाटांनीही का असा उच्छाद मांडला होता ,
मनातल्या तुफानानेही जेव्हा जोर धरला होता .
नभाला ढगांची बरी साथ होती
येशील कदाचित उगीचच आस होती
तू नव्हतीस म्हणून काय दंगा केला ,
एकटाच आसवांसवे किनारा धुंडाळला .
No comments:
Post a Comment