Monday, 28 December 2015

Don't worry be happy



                पती-पत्नीच्या नात्यातील तणाव , त्यातून मार्ग … म्हणजे तणावातून  happy   मार्ग असे छोटेसे कथानक असले,  तरीही ती आजच्या पिढीची कथा आहे . तरुण पिढीच्या सुखाच्या कल्पना बदलल्या आहेत . चकचकित   आयुष्याचा सोस . मोठ घर , सुविधा याला प्राधान्य .  आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी मग दोघांची  होणारी धावपळ हे तर आजच्या  पिढीच दिसणार  प्रातिनिधिक चित्र. या  चित्रात तिसऱ्याला स्थान नसत . त्यासाठी होणारी धावपळ , तणाव  सोसण्याची तयारी  .

           नाटकातील नायक - नायिका अशाच तणावातून जात आहेत . दोघांच्या  वेगळ्या कामामुळे , व्यस्ततेमुळे एकमेकाकडे व्यक्त होण्यासही  फुरसत नाही .  दोघेजण आपल्यापरीने प्रयत्न करत आहेत .त्यातून दोघे  जवळ येण्यापेक्षा गैरसमजुतीची दरीच   वाढतेय . त्यांचा मित्र दोघांना जवळ आणण्याचा प्रयत्न करतोय परंतु सफल होत नाही .

         नायिकेला PCOD ( Poly-cystic Ovary    Disease ) ची समस्या आहे. या आजाराबाबत  लोकाना  जास्त  माहिती नाही .  वैद्यकीय जगातही उपचार होत असले  नेमके कारण समजू शकलेले नाही .  उपचारही नेमक निदान  होईल इतका प्रगत नाही . या आजारात स्त्रियांमध्ये हार्मोनल  बदल घडत असतात ,  तिच मासिक  पाळीच चक्र बदलत . बाळ  नैसर्गिकरित्या होण्यास समस्या उद्भवतात .  त्यातून  , सामाजिक ,कौटुंबिक  तणाव  असतो. PCOD च एक कारण कोणत्याही प्रकारचा तणावही आहे .

            बाळ  हवच या परंपरागत चौकटीचा  पगडा आपल्यावर असतो . त्यामुळे एखाद्या जोडप्यास वैद्यकीय कारणामुळे बाळ होऊ  शकत नसेल , प्रसुतीवेळी आईचा जीव धोक्यात  येऊ शकेल या गोष्टींचाही विचार  केला जात  नाही . नायिका , नायक एकमेकांमुळे आलेल्या तणावातून मुक्त होण्यासाठी काही काळ वेगळ राहण्याचा विचार करतात . त्यानंतर नायिका घटस्फोट घेण्याचा निर्णय घेते . तों निर्णय  अंमलात येतो का ?हे  नाटकात जरूर पहा . या   नाटकाने सुंदर मेसेजही दिलाय , त्याची खरोखर    आवश्यकता आहे .    आनंद  आजूबाजूलाच  असतो परंतु  आपण वरवर शोधण्यात स्वतःवरील तणाव वाढवतो . happiness comes in small   packets  हे आपणास उमजतच  नाही   कारण,   संयमाचा आणि सुखाच्या संकल्पनेचा अभाव . सुख स्वत:लाच  शोधता येईल याची  जाणीव नाटक पाहिल्यावर होते .

           स्पृहा  जोशी  यांच्या  "समुद्र " नाटकातील संयत, संवेदनशील , समजूतदार व्यक्तिरेखेपेक्षा  या नाटकातील भूमिका अवखळ , हट्टी ,मुक्त  अशी परस्परविरोधी    आहे. त्यांना विनोदाच  अंग    असल्याचही या नाटकातून जाणवलं .    "समुद्र " नाटकातील भूमिकेत एक अवघडलेपण, गुंतागुंत आहे. याउलट  या नाटकात पूर्णपणे भिन्न व्यक्तिरेखा आहे.  स्पृहा जोशी यांनी,  या भूमिकेत आवश्यक असलेली उर्जा , मुक्तपणा,अल्लडपणा   त्यांच्या नैसर्गिक अभिनयाने साकारत  प्रणोतीची  व्यक्तिरेखा जिवंत केली  आहे . उमेश कामत यांचा अभिनय उत्स्फुर्त आहे . मिहिर राजदा यांच्या व्यक्तिरेखेने धमाल आणली आहे . fresh करणार अन त्याबरोबर सामाजिक संदेश देणार सुंदर नाटक जरूर पहा . 

No comments:

Post a Comment