Monday, 11 January 2016

मी

जगण आणि सुख एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत .
 सुखात जगण नाहीतर जगण्यात सुख शोधण....  
 याचाच तर धांडोळा सुरु आहे . 
 सुख आत आत खोलवर . जाणवत का ?
 त्याचे तुषार सर्वांगात . 
या जगात आल्यावर  येईपर्यंत नव्हता प्रश्न  अस्तित्वाचा.... 
 नव्हती भ्रांत उद्याची .....
 हसायला आणि रडायला  काही कारण लागत नव्हत . 
मुक्त भाव होते माझे..... .
 दडपलेल्या नव्हत्या भावना खोल अगम्य डोहात .  
या दडपलेल्या भावनांचे  फुत्कार झेलतय मन . 
आपल्याच  कोशातून मुक्त होण्यासाठी तडफडणार मन . 
आपल्याच विचाराच्या सूक्ष्म  ठिकऱ्या करून 
त्यातून पुन्हा उभ राहत एकजीव होणार मन . 
क्षणात कोसळून  लुप्त लुप्त होणार....  थिजलेले मन .
 कुठे आहे हे मन  ज्याने विचार करतो ?
 ते मन की , केवळ एक मेंदूचा तुकडा . 
या  एव्हढ्याश्या  तुकड्यात सामावले आहे अवकाश . 
सामावली आहेत खोल स्पंदन . 
सूक्ष्म  भावनांचे अनंत तरंग ते करतात जागृतीची जाणीव . 
तरीही प्रश्न उरतोच अस्तित्वाचा . हा प्रश्न भेडसावतोय..... .   
जगण , सुख , मन, मी
 काहीच कळेनास झालंय …. 
माझ नेमक' मी' पण हरवलंय या सर्वात …. 

कशाचाही बोध न होता  ....

No comments:

Post a Comment