युध्दस्य कथा रम्य ,प्रेरणादायक , मार्गदर्शक असल्या तरी लोकांना
प्रेमकथांची भुरळ पडत असते. देदिप्यमान इतिहासाकडे, उद्दिष्टांकडे दुर्लक्ष होऊन कल्पनेच्या भराऱ्यातून रंगवलेल्या प्रेमकथा जास्त प्रसिध्द होतात. इतिहास
पुराव्यानुसार तपासावा लागतो.बाजीराव -मस्तानी ही अशीच एक प्रेमकथा असून त्यामुळे महाराजांच्या राज्यविस्ताराच्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकार करण्याचे अलौकीक कार्य करणाऱ्या बाजीरावाच्या दुर्मिळ नेतृत्वगुणाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्याच्या आयुष्यात आलेली ही मस्तानी कोण होती?
मस्तानी ही छत्रसालची मुलगी होती. म्हणून ती जन्माने हिंदु ठरते, असा एक मतप्रवाह आहे . तसेच ती निजामाची मुलगी असल्याचीही एक शक्यता वर्तवण्यात येते. ती यवनी असल्याचा संदेह शनिवारवाडयास का होता किंवा तिच्यामुळे वादंग झाले का ?याबाबत स्पष्ट पुरावे नाहीत. दोन वेगवेगळे मतप्रवाह आहेत. त्यात एक म्हणजे छत्रसाल राजास मुस्लिम (दुसरी पत्नी) पासून झालेली ती कन्या होती. मस्तानी वरुन बाजीरावास त्याचे कुटुंबियापासून मानसिक क्लेश भोगावा लागला किंवा कसे याबाबत त्याने रावेखेडीस असताना, नानासाहेबास मस्तानीला रावेरखेडी येथे पाठविण्याबाबत पाठविलेले पत्र परंतु प्रत्याक्षात काशीबाईस पाठविण्यात आले यावरुन मस्तानीच्या अनुषंगाने शनिवारवाड्यात मतभेद असल्याचे दिसून येते . बाजीराव-मस्तानी जिवंत असताना समशेरबहाद्दूर गादिचा वारस ठरण्याची शक्यता होती म्हणून नानासाहेबांनी मस्तानीला त्रास दिला असेही प्रतिपादन आहे . समशेरबहाद्दूर हयात असेपर्यंत हा प्रश्न केव्हाही उद्भवू शकला असता तर नानासाहेबांनी त्याचा काटा काढण्याचे मनसुबे आखले असते . कदाचित शाहू महाराजांचा धाक असेल तर तो धाक मस्तानीला देतानाही असायला हवा होता . अर्थात हे सर्व तर्क-वितर्क आहेत .
वरील सर्व घटना एकमेकात गुंफून बाजीराव-मस्तानीची प्रेम कहाणी रंगविण्यात आली असे वाटते. मस्तानी बदद्ल फार थोडी माहिती उपलब्ध आहे. छत्रसाल राजा, त्याची मुलगी, बुंदेलखंड येथील लढाई, मस्तानी, बाजीरावने शनिवार वाडयात तिच्यासाठी बांधलेला महल,मस्तानीचा उल्लेख असलेली काही पत्रे, कुटुंबियांचा विरोध या तुटक दुव्यातून मस्तानीची कहाणी जोडण्यात आली आहे.

सर्वप्रथम छत्रसाल कोण होता हे पहावे लागेल. छत्रसाल हा, राजा चंपतराय (मेहावचा राजा) यांचा मुलगा.
चंपतराय
राष्ट्रप्रेमी राजा होते.
त्यांना
मोगलांचे स्वामित्व मान्य
नव्हते. चंपतराय
यांना विश्वासघाताने ठार
मारण्यात आले.छत्रसाल
त्यावेळी लहान होता.
त्यांनी
राजे शिवछत्रपती यांचीही मदत
मागितली होती.
त्यावेळी
राजांनी त्यांच्या मुलखात
जाऊन त्यांनी स्वातंत्र्य
मिळविण्याचा सल्ला दिला.
औरंगजेबाने
बुंदेलखंडात सुरु केलेल्या
कारवायामुळे बुंदेलखंड
छत्रसाल यांच्या नेतृत्वाखाली
उभा राहील.
मोगलांच्या
लढाया सुरु होत्या परंतु
छत्रसालने त्यास दाद दिली
नाही. 1927 मध्ये
महमंद बंगशला पाठविण्यात आले
इथे बाजीरावाचा राजा छत्रसालशी
संबंध आला त्यावेळी राजा
छत्रसाल 80
वर्षाचा
होता. मार्च, 1929 मध्ये
छत्रसाल व बाजीराव यांची भेट झाली होती. छत्रसाल हा प्रणामी पंथाचा अनुयायी होता. सदर पंथात धर्म,जात इत्यादींना थारा नव्हता. त्यावेळी पराभूत राजाच्या राज्याबरोबर सुरक्षिततेचे संबंध ठेवण्यासाठी सोयरीक ठेवण्याची पध्दत होती. अर्थात राज्याचे हित हा कार्यकारणभाव त्यामागे असे. असे असताना पेशव्यांच्या कुटुंबियात कलह होण्याचे कारण काय? मस्तानीच्या मुलाला राज्यात हिस्सा दयावा लागेल अशी भीती असावी कदाचित असा एक कयास करता येतो.छत्रसालने बाजीरावाला आपला मुलगा मानले. त्याला दोन मुले होती. त्याने बाजीरावला तिसरा हिस्सा दिला.त्यात झांशी, सागर, काल्पी इत्यादी भाग होते. तसेच आपली मुलगी मस्तानी बाजीरावला दिली. मस्तानी नेमकी केव्हा पुण्याला आली याचा स्पष्ट उल्लेख इतिहासात नाही.
राजनीती, उद्दिष्ट या पैलूतून पाहिल्यास बाजीरावाच्या
दृष्टीने राजा छत्रसालाचे
आमंत्रण त्याच्या दृष्टीने
पर्वणी होती कारण उत्तरेकडे
जाण्याचा बुंदेलखंड एक महत्वाचा
सेतू होता. राज्यकर्ते एक व्यापक दृष्टीकोन व उदिद्ष्ट डोळयासमोर ठेऊन कार्य करत असतात. बाजीरावाचा त्याच्या आयुष्यातील एकूण घटनाक्रम पाहिला तर उत्तरेपर्यंत राज्यविस्तार हेच त्याचे उदिद्ष्ट असल्याचे दिसून येते. त्यासाठीच आयुष्यभर तो कार्यरत होता. राज्य
खुळचट भावनांवर चालत नाही
त्यास व्यापक दूरदृष्टी असावी
लागते. राजा
छत्रसाल यांस स्थैर्य प्राप्त
करण्यासाठी बाजीरावाची मदत
आवश्यक होती तर बाजीरावास
उत्तरेवर स्वारी करण्यास
बुंदेलखंड आवश्यक होता.
राजकारणात
कार्यकारणभाव स्वार्थापोटी
लपटलेले असतात परंतु हे स्वार्थ
व्यक्तीगत नसले तर त्यास नैतिक
अधिष्ठान प्राप्त होते.
बाजीरावाचा
स्वार्थ हा व्यक्तीगत नव्हता.
राजाच्या
विस्तारासाठी होता.
उत्तरेत
पाय रोवण्यसाठी होता.बाजीरावाचा घौडदोडीचा वेग प्रचंड होता. वेगवान, अचानक हालचाली करून शत्रूला चकवा देणे हा त्याच्या युद्धशास्त्राच्या नीतीचा खास गुण होता . जातीभेद न मानणे,सर्वांना बरोबर घेऊन मार्ग काढणे हे ,त्याच्या राज्याच्या एकीचे व यशाचे गमक होते .
बाजीरावाच काळ 1720 ते 1740 इतका आहे. 1720 मध्ये त्यांचे पिता पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचे निधन झाल्यानंतर बाजीराव पेशवा झाला. त्याचे धाकटे बंधू म्हणजे वसईवर स्वारी केलेले चिमाजी अप्पा. त्यांची आई राधाबाई .
बाजीरावाच्या पराक्रमापेक्षा मस्तीनीची प्रेमकथा फुलविण्यात लेखकांना रस असल्यामुळे त्यांचा पराक्रम झाकोळला गेला आहे.41 लढाईतील अजिंक्य योध्दा ही वस्तुस्थिती नजरेआड केली गेली आहे. तो ध्येयाने प्रेरित असा योध्दा होता. त्याच्या पराक्रमाला सीमा नव्हती. थेट उत्तरेपर्यंत त्याचा विस्तार होता. महाराजांना त्यांच्या कार्यकाळात उत्तरेपर्यंत जाण्यास उसंतच मिळाली नाही. बाजीरावाने ते स्वप्न पूर्ण केले.त्याची आई राधाबाई, बंधू व पुत्र नानासाहेब यांच्या मस्तानी प्रती वर्तनाने बाजीराव दु:खी असल्याचे दिसते . मस्तानीला त्याने रावेरखेडी(1740)येथे असताना त्याच्याकडे पाठविण्याची नानासाहेबाला विनंती केली होती .परंतु प्रत्यक्षात काशीबाई यांना पाठविण्यात आले . 1740 च्या अखेरीस चिमाजी अप्पाचे देखील निधन झाले. बाजीरावास मस्तानीपासून झालेला पुत्र समशेर बहादूर पुढे पानिपतच्या युध्दात मरण पावला. .

मस्तानी नावाचे पात्र इतिहासात होते काय? याचा तपास करताना खालील घटना मधून दुवे साधता येतील.
- जो गति ग्राह गजेंद्रकी सो गत भई है आज
बाजी
जात बुदेलकी बाजी लाज
वरील प्रसिध्द दोहा हा ,राजा छत्रसालने बाजीरावाची मदत मागितली होती याचा पुरावा आहे.ही घटना साधारण 1930ची आहे.

- शनिवार वाडा 1930 मध्ये बांधण्यास सुरवात, दोन वर्षात बांधकाम पूर्ण. त्यात मस्तानी महल आहे.
- मस्तानी पुण्याला नेमकी केव्हा आली याची माहिती नाही. समशेर बहादूर याचा जन्म 1734 च्या आसपास झाला.
- समशेर बहादूर 1761 च्या पानीपत युध्दात मरण पावला.
- बाजीरावांचे नानासाहेबास मस्तानीला रावेरखेडी येथे पाठविण्याबाबत पत्र
- मस्तानीची कबर पुणे पाबळ
बाजीराव यांचा मृत्यू नासिरजंग याच्यावरील चढाईनंतर नर्मदेच्या काठी रावेरखेडी येथे झाला. मृत्यूचे कारण अचानक आलेला ताप हे होते. बाजीरावाचा अकाली झालेला मृत्यू याचा संबंध मस्तानीच्या वियोगाशी जोडण्यात आला असावा . बाजीरावाचा 1720 पासून राज्यविस्तारासाठीची घौडदाैड पाहिल्यास, अतिश्रमाने, दगदगीने आजार् बळावल्याची शक्यता नाकारता येत नाही. बाजीराव यांचे पुत्र नानासाहेब मस्तानी विरोधात होते असे असते तर,त्यांनी बाजीराव पश्चात समशेर बहादूर यांचा सांभाळ केला नसता.
मस्तानी किंवा तिच्यामुळे होणारा अंतर्गत कलह यामुळे बाजीराव उद्दिष्टापासून ढळला होता काय? याचे उत्तर नाहीच दयावे लागेल कारण 1930 नंतर केव्हातरी मस्तानी त्याच्या आयुष्यात आली, 1940 पर्यंत तो अनेक युध्द लढला त्याची रोजनिशी पाहिली असता तो सतत राज्याच्या विस्तारासाठी कार्यरत असल्याचे दिसून येते. . बाजीराव यांचे अकाली निधन झाले नाहीतर इतिहासाने वेगळे वळण घेतले असते व त्याचा विस्तारही वाढला असता. राजकीय उद्दिष्ट डोळयासमोर असताना भावनिक पैलू गौण असतात. केवळ कथा कांदबऱ्यातून अशा कथा ROMANTIC वाटतात परंतु वस्तुस्थिती झाकोळली जाऊन इतिहासाचे फार मोठे नुकसान होत.

No comments:
Post a Comment