Friday, 15 January 2016

या माझ्या मौतीला या

या माझ्या मौतीला या........

काळ्या रमला नंदनवनी
त्यास कुठे कळवळा
न उमेद न  आशा
गडप झाली छाया
सरली आभाळाची माया


मायबाप कोरडे कोरडे
त्याले आभाळाची साथ
माझे जगणे जगणे
माझा मलाच शाप
या म्हणून माझ्या मौतीला या ….

माती रक्ताने सिंचली
पाझर फुटेना फुटेना
 टिपे देती जोड
दिला  घामाचा ओलावा
झाला जीव वेडापिसा


कोरड्या कोरड्या जगाला
काय त्याचे घेणे
काय मज नेणे आता
कोनाड्यात एकले गाऱ्हाणे
या म्हणून माझ्या मौतीला या......

 जमिनीला भेग
माझ्या काळजाची चीर
फुलेल का  पालवी
झाली झाली वेळ
थांबव तुझे खेळ

झाले जिणे दुश्वर
असा कसा  तू ईश्वर
सांडली सांडली आशा
गेली जगण्याची रया
या म्हणून माझ्या मौतीला या.....

No comments:

Post a Comment