Friday, 22 January 2016

मुलीच्या बापान का झुकाव …

भीकमांग्यांची टोळधाड निघालीय बेफाम
आभाळानं पोळलेल्या ओसाड प्रदेशात
सडक्या अात्म्यासह देहाच्या विक्रीला,
निघाली नवरे असलेल्या बैलांची फौज

उधळलीय चौफेर बैलांची फौज
तुडवीत मन, जोडीत पापी धन
टांगून आत्मसन्मान ,समाजाच्या वेशीवर ,
निघाली नवरे असलेल्या बैलांची फौज

खुरडत पालवी , कुरतडत माणुसकी
 हिसकावूनी ताट, सोडूनी लाज
महान संस्कृतीचे गुणगान गात  ,
निघाली नवरे असलेल्या बैलांची फौज

लक्ष्मी ती, आदिमाया ती
अंत नसे  संस्कृतीच्या बातांना
ना  भय ना लज्जा या दैत्यांना ,
निघाली नवरे असलेल्या बैलांची फौज

समाजाच भूत समाजानेच आवरायचं
आपणच आपल्याला शहाण करायचं
कशाला हवी अशी ही स्वार्थी ,
नवरे असलेल्या बैलांची फौज


आभाळान नाडाव,  हुंड्यान जाळाव
पोरीन जीवाला का मुकाव ?
मुलीच्या बापान का झुकाव …
या नवरोबांना  काय त्याच ...तरीही चौफेर उधळलीय ....
नवरे असलेल्या या बैलांची फौज......

No comments:

Post a Comment