कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन . अर्थात फळाची अपेक्षा न करता कर्म करीत रहा . यात एक कर्म अपेक्षित आहे की , अनेक ? जर अनेक कर्मे अपेक्षित असतील तर प्राधान्य कशाला द्यायचं ?याची उकल प्रत्यक्ष आयुष्यात होऊ शकली नाही , तर त्यातून भावनिक गुंतागुंत निर्माण होऊ शकते .करिअर आणि पत्नी यात प्राधान्य कशाला द्यायचं ? करिअर मध्ये गुंतलात तर पत्नीच्या भावनिक विश्वात पोकळी निर्माण होऊ शकते . पत्नीमध्ये गुंतलात तर करिअर वर परिणाम होऊ शकतो . एक व्यावसायिक गरज तर एक भावनिक .भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ म्हटलं तर सामान्य माणसाच्या आयुष्यात उलथापालथ झालीच म्हणून समजा .
मंदार
आणि देवयानी या जोडप्याची ही
कहाणी आहे .
सुरवातीचा
काळ हा वेडेपणाने भारलेला
काळ असतो .
म्हणजे
मंदारच्या म्हणण्याप्रमाणे
ज्या काळात बायकोचे ढेकरही
सुंदर वाटतात तो काळ .
रोमान्स
नसानसात भिनलेला अन रक्तातून
सळसळत वाहत असतो .
आपल्या
जोडीदाराचे लक्ष वेधण्यासाठी
प्रियकर गुंतलेला असतो .
या
प्रेमाच्या विश्वात दोघेही
गुंतून गेलेले असतात .
तेच
त्यांचे छोट विश्व असतं .
त्याच
सतत तिला जपण ,
तिच्याकडे
लक्ष देण तिला मोहवत असत .
ती
त्याची ठकी असते ,
तो
तिचा गुरु असतो .
मग
काळ सरायला लागतो .
वास्तवतेचे
भान येऊ लागते .
काळाच्या
ओघात प्रणयाचा गडद पडदा विरळ
होऊ लागतो .
संसार
चालवण्यासाठी करिअरही आवश्यक
असते .
केवळ
प्रेमावर जगता येत नाही ,
याच
भान येऊ लागत .
त्यातून
पत्नीच्या जीवनात एक रितेपण
येऊ लागत .
ती
भूतकाळातील गुरु ,
ठकी
वर्तमानकाळात शोधू लागते .
रोमांटिक
गुरूची कल्पना करून आपली
भावनिक गरज पूर्ण करण्यासाठी
त्याला मध्यवर्ती कल्पून ती डायरी लिहू लागते .
अर्थात
हा असतो कल्पना विलास .
डायरी तिच्या मुलीच्या हाती
लागते अन तिच भावनिक विश्व हादरत
. आई
वरील प्रेमच रुपांतर तिरस्कारात होत .
ती
त्रयस्थ बनून तिच्या वडिलांना
याची माहिती देत असते .
मंदार
देवयानी यांच्यातील नाते
मुलीच्या माध्यमातून समोर
येत .
ती
जे नाटक लिहिते आहे ,
त्यात
तिच्या आयुष्यात येणारी
खरीखुरी पात्रं आहेत .
नाटकात
हल्ली एका प्रसंगातून दुसरा
प्रसंग उलगडण्यासाठी रंगमंचाचा
प्रभावी वापर करण्यात येतो
.
प्रकाश
योजनेचा परिणाम साधत प्रसंग
वास्तवदर्शी केले जातात .मुलीच्या
नाटकात ठकी ,
गुरूचा
हात पकडून तिच्या विश्वात
जाण्याचा निघून
जाण्याचा पर्याय निवडते .वास्तव
जीवनात देवयानी सोबत राहते
का ? गुरु शिवायच्या मंदार सोबत आयुष्य व्यतीत करण तिला कठीण जातंय का ? त्यातून ती काही वेगळा मार्ग अवलिंबते का ? यासाठी नाटक पहाव .
त्रिकोण प्रकारातल हे नवीन नाटक . त्रिकोणाच्या किती श्यक्यतांचे प्लॉट लेखकांच्या मनात घोळत असतात कोण जाणे . त्रिकोण कथेचा बाज धक्कातंत्र , खुमासदार संवाद यावर आधारित आहे . त्यामुळे ते नाविन्यपूर्ण आणि ताज वाटत .
त्रिकोण प्रकारातल हे नवीन नाटक . त्रिकोणाच्या किती श्यक्यतांचे प्लॉट लेखकांच्या मनात घोळत असतात कोण जाणे . त्रिकोण कथेचा बाज धक्कातंत्र , खुमासदार संवाद यावर आधारित आहे . त्यामुळे ते नाविन्यपूर्ण आणि ताज वाटत .
No comments:
Post a Comment