भकास नभ भकास वाट
काहिलीत उन्हाच्या जाळणे बरे नाही
डोंगर पल्याड एकटा करी आकांत
कुशीत त्याच्या लपणे बरे नाही
वृक्ष -वेली चंचल सोडती उसासा
श्वासातून त्या फसवणे बरे नाही
लाटांनाही हा कसा उच्छाद मांडला
हळूच स्पर्शुनी जाणे बरे नाही
पक्षीही आता किलबीलती वदंता
मैफिलीतून माझ्या उठून जाणे बरे नाही .
काहिलीत उन्हाच्या जाळणे बरे नाही
डोंगर पल्याड एकटा करी आकांत
कुशीत त्याच्या लपणे बरे नाही
वृक्ष -वेली चंचल सोडती उसासा
श्वासातून त्या फसवणे बरे नाही
लाटांनाही हा कसा उच्छाद मांडला
हळूच स्पर्शुनी जाणे बरे नाही
पक्षीही आता किलबीलती वदंता
मैफिलीतून माझ्या उठून जाणे बरे नाही .
No comments:
Post a Comment