Friday, 12 February 2016

नको अस वाटायला …

नको अस वाटायला …

निराशेच्या जळमटांना झटकायचं होतं
घुसमटीला मोकळ  करायचं होतं
पाखरांसारख किलबिल बोलायचं होतं
पावसात तुझ्यासवे भिजायचं होतं


झंझावाती वादळांना  झेलायचं होतं
स्वप्नांना पंख  लावून उडायचं होतं
सोबतीने तुझ्या बागडायचं होतं
जगणं  खरच जगायचं होतं

No comments:

Post a Comment