Friday, 11 March 2016

जीवन

जीवनाचे पैलू अनेक
का कोषात तू गुंतला
जीवनाचे रंग विविध
का रंगहीन तू राहिला

जीवन एक मुक्त हवा
जीवन इंद्रधनुषी छटा
घे आस्वाद हर रंगाचा
घे आनंद सृजनतेचा

पहा जग पलीकडे
ने उंचीवर स्वतःला
उकल जीवनाचे सत्य
दे सराव मनाला

नाही सकल पुस्तकात
नाही छोट्या परिघात
विश्व आहे अनंत अफाट
नाही  मावणारं अंगणात

ये बाहेर , तोड बेड्या
मनास स्वतःच बांधलेल्या
निसर्गाला घे समजून
सूत्र त्याचे घे समजून




No comments:

Post a Comment