Friday, 11 March 2016

अशांत

रान गर्द भरलेले
ठाव  मनाचा लागेना
अशांत या जंगलात
साद मनाची येईना

झाल्या दिशा अरुंद
मार्ग त्यात गवसेना
अंधाऱ्या या डोहात
स्वयंप्रकाश उमलेना

जग बाभळीचे काटे
खरचटले अवघे मन
रक्तबंबाळ बंबाळ
 आपल्याच जनातं

कसा उसवू हा पेच
पोकळी या विश्वात
हा परीघ पिंजरा
शोध घे अनंतात 

No comments:

Post a Comment