जीवन कसलं ?स्मशान आहे .
जगण्याला कसला आशय आहे .
दुभंगलेल्या सत्वहीन स्मशानात
मुडद्यांच जगणं सुरु आहे .
चेतना हरवलेल्या , दिशाहिन ,
स्वार्थाच जाळं विणलेल्या
रया नसलेल्या स्मशानात
मुडद्यांच जगणं सुरु आहे .
या मुडद्यातला मी एक मुडदा
श्वास घ्यायचा म्हणून घेत ,
अंधाऱ्या कोरड्या स्मशानात
मुडद्यांच जगणं सुरु आहे .
जगण्याला कसला आशय आहे .
दुभंगलेल्या सत्वहीन स्मशानात
मुडद्यांच जगणं सुरु आहे .
चेतना हरवलेल्या , दिशाहिन ,
स्वार्थाच जाळं विणलेल्या
रया नसलेल्या स्मशानात
मुडद्यांच जगणं सुरु आहे .
या मुडद्यातला मी एक मुडदा
श्वास घ्यायचा म्हणून घेत ,
अंधाऱ्या कोरड्या स्मशानात
मुडद्यांच जगणं सुरु आहे .
No comments:
Post a Comment