Monday, 14 March 2016

आभास

मन का भिजले
तन का भिजले
अवचित मेघ
दाटून का आले

सुटला वारा बेभान
घेऊन सोबत  मना
श्वास आतूर झाले
शब्द कातर झाले


मखमली क्षणांनी
तोल ढळला जरा
गुलाम मन माझे
सावर तू मला

आभास वाटे खरे
क्षण रेशमी झरे
पेच हा जुना
काय माझा गुन्हा

गुंतला जीव वेडा
उसव गाठ जरा
हरवलो स्वप्नात तुझ्या
जागव  माझ्या मना 

No comments:

Post a Comment