Monday, 14 March 2016

बाळाची खंत .

             नवरा -बायको उच्च शिक्षित , पाच आकडी पगारदार .  जगण सर्व आधुनिक सोयींनी युक्त . या सोयींचा उपभोग घेण्यास दोघांकडेही वेळेची वानवा .आधुनिक सुखाची व्याख्या म्हणजे मोठं घर , गाडी , तगडी बँक  बचत . सर्व काही अपेक्षेपेक्षा जास्तच . ज्या सुखासाठी मरमर मरायचं त्याचा सहवास मात्र अल्प . घरात बाळ नाही . याची चिंता त्या दोघांपेक्षा इतरांना जास्त . दोघांना वैद्यकीय सल्ले सुद्धा मिळाले (मागितले नसताना ). दोघे त्रस्त झाले होते ,  समाज आणि कुटुंबियांकडून होणाऱ्या अनाहूत सल्ले आणि प्रेशर मुळे  . मग दोघांनी आपल भविष्याचं नियोजन तपासलं . वेळेची गणित मांडली.  बाळा साठीची  वेळ निश्चित केली . गोंडस बाळ जन्माला आलं . दोघांनी बाळासाठी केअर -टेकर ठेवली . त्यांची जबाबदारी संपली . नियोजनाप्रमाणे ते पुढच्या कामाला लागले . एखाद्या यंत्राप्रमाणे . बाळ  रडत होत  . मायेच्या उबेला आसुसत होत . टपोऱ्या डोळ्यांनी वाट पाहत होत . हिरमुसलं होत . काही सांगण्याचा  प्रयत्न करत होत . सांगत होतं आपली खंत . 
"   माझा जन्म माझ्या हातात नव्हता . याची जाणीवही मला नव्हती . माझी संमत्ती घेण्याची सोयही निसर्गाने केलेली नाही . दोघानीच ठरवलं,  लादल माझ्यावर , जन्माबरोबर एकटेपण. सर्व सुख आहेत एक उबदार स्पर्श नाही . ही सुख त्या स्पर्शासमोर कवडीमोल आहेत . त्यांना काय हवं त्यांनी केलं . मला काय हवय ? यासाठी त्यांच्या वेळापत्रकात स्थान नाही . मग का हा अट्टाहास ? केवळ समाजासाठी, स्वतःसाठी  . मग मला काय हव याचा  विचार झाला कि नाही ? का त्यांच्याच परिप्रेष्यातून आयुष्य पाहावं लागणार आहे ?    


No comments:

Post a Comment