Amicable या शब्दाचा शब्दश : अर्थ मैत्रीपूर्ण , स्नेहपूर्ण , मैत्रीचा करार असा आहे . या अर्थाचा तत्व पाळणाऱ्या काही संख्यांच्या जोड्याही असतात . या संख्यांना फक्त एकमेकाचे योग्य विभाजाक स्वीकारार्ह असतात . जणूकाही "एक दुजे के लिये " बनलेल्या . दोघात एक अलिखित करार झाल्यासारख्या .
a आणि b दोन संख्या घेतल्या तर , a च्या योग्य विभाजाकांची बेरीज b एवढी असते . b च्या योग्य विभाजाकांची बेरीज a एवढी असते . (एखाद्या धन पूर्ण संख्येचे ती संख्या सोडून इतर विभाजक म्हणजे योग्य विभाजक ) अशा संख्यांना Amicable numbers म्हणतात .
उदा . a =२२० , b =२८४
a चे योग्य विभाजक - १,२,४,५,१०,११,२०,२२,४४,५५,११० यांची बेरीज येते -२८४
b चे योग्य विभाजक- १,२,४,७१,१४२ यांची बेरीज येते -२२०
(२२०,२८४) हि जोडी या संख्यांमधील सर्वात लहान जोडी आहे .
या स्नेहपूर्ण संख्यामधील विभाजाकांनी जोडलेले नातं पाहिलं कि सहजपणे कविता स्फुरते .
माझ्या विभाजाकांचे
पूर्णत्व तू रे
तुझ्या अवयवांची
गोळाबेरीज मी रे
हा करार स्नेहपूर्ण
हे नातं मैत्रीपूर्ण
तुजवाचून सर्व
अपूर्ण, अर्थहिन रे

No comments:
Post a Comment